गावगाथा

समाजातील अंधश्रद्धा दूर करुन देशाला बलवान बनविणे काळाची गरज…… प्रा. डॉ. महेश मोटे

येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये डॉ. महेश मोटे बोलताना डॉ. सुधीर पंचगल्ले, अरविंद बिराजदार, संजय गुरव व अन्य.

समाजातील अंधश्रद्धा दूर करुन देशाला बलवान बनविणे काळाची गरज…… प्रा. डॉ. महेश मोटे

मुरुम, ता. उमरगा, ता.१२ (प्रतिनिधी) : देवा धर्माच्या नावाने कोणीही शोषण करीत असेल तर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा दूर करुन देशाला बलवान बनविणे काळाची गरज असल्याचे विचार प्रबोधनातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी व्यक्त केले. नाईक नगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराप्रसंगी व्याख्याते सोमवारी (ता. १२) रोजी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले होते. यावेळी डॉ. अरविंद बिराजदार, डॉ. संजय गुरव, डॉ. राजू शेख, प्रा. राजकुमार तेलंग आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. मोटे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रसंगातून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यास सांगितले. अंधश्रद्धा शहरी भागांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाही परंतु देशातील बहुतांश ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांमध्ये लोक अंधश्रद्धेला मोठ्या प्रमाणात बळी पडलेले दिसतात. मुख्यता ग्रामीण भागातील लोक हे अशिक्षित असतात. त्यांना समाजात चालू असणाऱ्या नवीन चाली रुढीचे पुरेसे ज्ञान नसल्याने असे लोक जुन्या चालीरीतीच्या आणि परंपरेच्या मार्गावर चालतात. यातूनच त्यांच्या मनामध्ये अंधश्रद्धा जन्म घेते. याचा फायदा समाजातील ढोंगी बाबा, बुवाबाजी करणारे आणि जादूटोणा करणारे लोक घेतात. ग्रामीण भागातील लोकांचे शारीरिक, मानसिक, बौध्दीक, आर्थिक शोषण होते. अशा अंधश्रद्धेतून आपल्या देशाला पूर्णता मुक्ती मिळवून देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज बनली आहे, असे ते शेवटी म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिला स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अशोक बावगे तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले.

फोटो ओळ : नाईक नगर, ता. उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये डॉ. महेश मोटे बोलताना डॉ. सुधीर पंचगल्ले, अरविंद बिराजदार, संजय गुरव व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button