*इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सचे खडकी येथे भव्य उद्घाटन*
पुणे, सप्टेंबर २०२५ :
डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन (DMF) आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने, कौशल्य विकास व सामाजिक नवोपक्रमाच्या माध्यमातून युवक व महिलांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने महर्षी वाल्मिकी ग्रंथालय, नेहरू गार्डन, खडकी येथे आंतरराष्ट्रीय उत्कृष्ठता केंद्राचे (International Centre of Excellence) भव्य उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन समारंभास मा. ब्रिगेडियर परमीत सिंह ज्योती, व्हीएसएम, अध्यक्ष – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच मा. डॉ. ज्ञानेश्वर मुळे (आयएफएस), सल्लागार – राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, नवी दिल्ली व माजी सचिव – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार अध्यक्षस्थानी लाभले होते.
समारंभास खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओ मा. श्रीमती मीनाक्षी पी. लोहिया (आयडीईएस), नामांकित सदस्य श्री. अभय के. सावंत, मा. श्री. ओमप्रकाश दिवटे (अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका), विनोदकुमार गायकवाड ( रिजनल आफीसर – पासपोर्ट आफिस पुणे), संस्थेचे भारती पाटील, रियाज पिरजादे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डीएमएफचे सीईओ श्री. उज्ज्वल साठे यांनी स्वागतपर भाषण केले. मान्यवरांचा सत्कार डॉ. मुळे व फाऊंडेशनचे सदस्य श्री. अनिल नानिवडेकर यांच्या हस्ते झाला. संस्थेचे सचिव श्री. गणेश नायकुडे यांनी आभारप्रदर्शन केले.
मुख्य भाषणात डॉ. मुळे म्हणाले :
“भारताकडे जगातील मानव संसाधन राजधानी बनण्याची क्षमता आहे. इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून डीएमएफ लाभार्थी व कौशल्यांमधील दरी कमी करून, सामाजिक नवोपक्रमांना चालना देईल आणि उद्योजकीय उपक्रमांना जागतिक संधींशी जोडेल. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी युवक आणि महिला असतील.”
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आभार मानताना डॉ. मुळे यांनी सहकार्याच्या माध्यमातून भारताची प्रतिभा जागतिक स्तरावर पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली.
आपल्या भाषणात ब्रिगेडियर परमीत सिंह ज्योती यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले :
“डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनचे प्रयत्न स्तुत्य आहेत. सामाजिक विकास व कौशल्य सक्षमीकरणाला चालना देणारे असे उपक्रम समाजावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम घडवतात. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अशा नवोपक्रमांना सदैव पाठिंबा देत राहील.”
👉 या भव्य खडकी व खडकी परिसरात केंद्राद्वारे युवक व महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नवोपक्रमाद्वारे नवी दारे खुली होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!