प्रणितीताई शिंदेंनी घेतले स्वामींचे दर्शन ; मुरलीधर मंदिर कामाचीही केली पाहणी
मुरलीधर मंदिरात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने प्रणिती ताई शिंदे यांचा सत्कार करताना महेश इंगळे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, अशपाक बळोरगी व अन्य दिसत आहेत.

प्रणितीताई शिंदेंनी घेतले स्वामींचे दर्शन ; मुरलीधर मंदिर कामाचीही केली पाहणी

(अक्कलकोट, दि.३०/३)
(श्रीशैल गवंडी)

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास
व मुरलीधर मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे व भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने हाती घेण्यात आलेले नियोजित मुरलीधर मंदिर भक्तनिवास बांधकामसाठी मुरलीधर मंदिरास भेट देऊन मुरलीधर मंदिराच्या पाड काम करण्यात येत असलेल्या कामकाजाची पाहणी केली तसेच यज्ञकुंडाची पूजाही केली व मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्रणितीताई शिंदे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना प्रणितीताई शिंदे यांनी कोणत्याही राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्याची सुरुवात करण्यापूर्वी स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अक्कलकोटला येत असतो म्हणून स्वामी दर्शनाने कार्य सिद्धीस जाते. या अनुषंगाने आजही येथे येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे व स्वामींच्या आशीर्वादाने पुढील कार्यास वाटचाल करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे, मा.नगरसेवक अशपाक बळोरगी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, पुरोहित मनोहर देगावकर, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे व अन्य नागरिकांसह स्वामी भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – मुरलीधर मंदिरात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने प्रणिती ताई शिंदे यांचा सत्कार करताना महेश इंगळे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, अशपाक बळोरगी व अन्य दिसत आहेत.
