गावगाथाठळक बातम्या

Pune : तब्बल 1734 सायकलस्वरांची पुणे-पंढरपूर सायकलवारी

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे (प्रतिनिधी):  इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे सालाबादप्रमाणे आयोजित केलेल्या पुणे-पंढरपूर-पुणे सायकल वारीत 1 हजार 734 सायकलस्वरांनी भाग घेत ही वारी पूर्ण केली. या वारीमध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे 374 महिलांचा सहभाग घेतला होता. एक दिवसात देहू ते पंढरपूर असे दोनशे पन्नास किलोमीटर अंतर पूर्ण करण्यात आले.तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर ते आळंदी अशी परतीची वारी करण्यात आली. सायकल वारीचे यंदाचे आठवे वर्ष होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

सायकलवारीचे शनिवार (दि.15) देहू येथील गाथा मंदिर येथून प्रस्थान झाले. यामध्ये एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी नितीन वानखेडे, प्रकाश शेडबाळे, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी महेंद्र दिवाकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंतराव हरहरे, उद्योजक अण्णारे बिरादार, माजी नगरसेवक अमित गावडे, सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल, डॉ संदीप सानप, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक श्रीराम पांनझाडे, अनिल सानप, उद्योजक ज्ञानेश कटकमवार, कामरआली शेख, माणिक डावरे, वैभव पाडेकर, गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

पायी वारीची वैभवशाली परंपरा असलेल्या भारतामध्ये सायकल वारीची सुरुवात इंडो ॲथलेटिक्स सोसायटीने 2016 साली केली. यामध्ये फक्त 7 जणांनी सहभाग घेतला हाेता.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

या सायकलवारीमध्ये, 2017 साली 24, 2018 साली 160 तर 2019 साली तब्बल 570 जणांनी सहभाग नोंदवला. पुढे 2020 आणि 2021 साली करोना मूळे वारीला परवानगी नकारण्यात आली तरी 2021 साली अमावस्येच्या रात्री 175 जणांनी रात्री पुणे ते पंढरपूर अंतर सायकलवर पूर्ण केले. त्यानंतर 2022 साली 1200 आणि 2023 साली 1500 तर या वर्षी 1700 हून अधिक संख्या असलेली ही भारतातील सर्वात मोठी आपली संस्कृती व परंपरा टिकवणारी सायकलवारी आहे असे इंडो अथलेटिक्स सोसायटीचे पंढरपूर वारी प्रमुख गिरीराज उमरीकर, संस्थापक सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले.

 

सायकल वारीचे नियोजन इंडो ऍथलेटिक सोसायटीचे श्रीकांत चौधरी, अमित पवार, अजीत गोरे, रमेश माने, सुशील मोरे, अविनाश चौघुले, श्रेयस पाटील, प्रतीक पवार, मारुती विधाते, प्रशांत तायडे, रोहित जयसिंघनी, योगेश तावरे, नितीन पवार, प्रमोद चिंचवडे, मदन शिंदे, कपिल पाटील, प्रणव कडू, संतोष नकाते, दीपक बुरकुल, प्रदीप टाके, मनोज चोपडे, प्रकाश कांबळे, सुनील चाको यांनी सहकार्य केले.

 

असा होता सायकल वारीचा मार्ग

देहू – निगडी – नाशिक फाटा – हडपसर – उरुळी कांचन – भिगवन – इंदापूर – टेंभुर्णी – पंढरपूर आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button