
खेडगी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या अक्कलकोट येथे विविध कार्यक्रम…

अक्कलकोट, दि. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन शिवशरण चनबसप्पा खेडगी
यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त ‘शिव-शरण अक्कलकोट भूषण’ सन्मान सोहळा आणि विविध क्षेत्रातील आदर्श पुरस्कार जाहीर झाले असून या पुरस्कारांचे वितरण सोमवारी दि. २४ जून रोजी सकाळी १० वाजता सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूल येथे करण्यात येणार आहे.

माजी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, श्री. शिवबसव राजेंद्र महास्वामीजी (खेडगी), श्री. ष. ब्र. जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य (हिरेजेवरगी), श्री. शिवलिंग महास्वामीजी (मादन हिप्परगा), श्री. प्रभुशांतलिंगेश्वर महास्वामीजी (हत्तीकणबस) व श्री. बसवलिंग महास्वामीजी ( अक्कलकोट)
यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

प्रारंभी सकाळी साडे नऊ वाजता खेडगी महाविद्यालयातील कन्नड भवन चे भूमिपूजन सर्व महास्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मातोश्री निलव्वाबाई खेडगी मराठी शाळेतील सेमी इंग्रजी विभागाच्या नूतनीकरणाचे उदघाटन मुख्याधिकारी सचिन पाटील, सकाळी साडेदहा वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानचा शुभारंभ तहसीलदार विनायक मगर, गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, महेश स्वामी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच बाल आरोग्य तपासणी शिबिरात बालरोग तज्ञ डॉ. राहुल लिंबीतोटे तपासणी करणार आहेत.

या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन बसलिंगप्पा खेडगी मित्र परिवाराने केले आहे.

चौकट —
पुरस्कारांचे मानकरी
संरक्षण सेवा मध्ये शास्त्रज्ञ भिमाशंकर गुरव( पुणे), माजी सैनिक शिवपुत्र घटकांबळे ( हसापूर),
प्रशासकीय सेवेमध्ये सहाय्यक पोलीस उपायुक्त मोतिचंद राठोड( दुधनी तांडा), माजी पोलीस अधिकारी लक्ष्मण व्हदलुरे ( सदलापूर), विधी सेवांमध्ये अॅड. बसवराज होळीकट्टी( मैंदर्गी),
अॅड. हर्षवर्धन एखंडे, आरोग्य सेवेत डॉ. सायराबेगम मोमीन – सलगरकर, डॉ. अर्जुन जोगदे ( चुंगी), शिक्षण सेवेत माजी प्राचार्य एम. ए. शेख, प्रा्. गुरुशांत हारकुड, उद्योग – व्यवसाय मध्ये उमेश पाटील( चपळगाव ), प्रमोद मोरे( कुरनुर), कृषी सेवेत अशोक हत्तुरे ( रुद्देवाडी), रमेश फुलारी ( बोरगाव देशमुख),
समाजसेवा मध्ये अध्यात्मिक सेवा सुदाम पाटील, टपाल सेवक महेश बिराजदार, निर्भया पथकाच्या निता बिराजदार, परिवहन सेवा मदनीपाशा जुनेदी, हलगीवादन राष्ट्रीय पदक राहुल गेजगे, राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रीय पदक ऐश्वर्या दिंडुरे यांचा स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन गौरविण्यात येणार आहे.