*दर शनिवारी दप्तराविना शाळा उपक्रम.हंजगी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला शिवारफेरी व वनभोजनाचा आनंद.*
*महादेव सिंदगी मळ्यात रंगला वनभोजनाचा कार्यक्रम.*

*दर शनिवारी दप्तराविना शाळा उपक्रम.हंजगी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला शिवारफेरी व वनभोजनाचा आनंद.*

*महादेव सिंदगी मळ्यात रंगला वनभोजनाचा कार्यक्रम.*


——-
अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील वाल्मिकी बालक प्राथमिक आश्रम शाळेत मुलांच्या पाठीवरचे दप्तरांचे ओझे कमी व्हावे आणि विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून दर शनिवारी आश्रम शाळेच्या वतीने दप्तराविना शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे.याच उपक्रमांतर्गत आज महादेव सिंदगी व सागर सिंदगी यांच्या शेतात वनभोजन व शिवारफेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थी व शिक्षक बांधव वनभोजनाचा मनसोक्त आस्वाद घेत शेतशिवारात फेरफाटका मारला.त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून यावेळी विविध नृत्य,गाणी आणि खेळ ही आयोजित करण्यात आला होता.शेवटी सिंदगी परिवारच्या वतीने आयोजित केलेल्या वनभोजनाचा आस्वाद घेत विद्यार्थी मनसोक्त आनंद लुटला.आश्रम शाळेतील मुलांना वनभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने आश्रम शाळेच्या वतीने महादेव सिंदगी व सागर सिंदगी यांचा यथोचित सन्मान करुन आभार व्यक्त करण्यात आला.
