Akkalkot: कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली मतदान जनजागृतीची शपथ; राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचा उपक्रम

अक्कलकोट (प्रतिनिधी): महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसवा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती करण्याची शपथ घेतली.


महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र अभ्यास मंडळाने आम्ही मतदान जनजागृती करणार हा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी प्राचार्य डॉ एस आर लोखंडे उपस्थित होते.


भारताची लोकशाही मजबूत करण्यासाठी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही मतदान करणार आणि नागरिक, महिला, युवक,युवती यांना देखील मतदान करण्यास प्रवृत्त करणार अशी शपथ उपस्थित विद्यार्थ्यांनी घेतली.
शहर व ग्रामीण भागातील सुजाण नागरिक महिला युवक, युवती यांनी मतदान करावे, यासाठी प्रबोधन करत स्वयंसेवक गावोगावी फिरणार आहेत. मतदान जागृती प्रबोधनाची चळवळ गतिमान करणार आहोत. असे यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा राजेश पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा राजेश पवार यांनी केले, सूत्रसंचलन प्राध्यापिका हर्षदा गायकवाड यांनी केले तर आभार विद्यार्थी समर्थ पवार यांनी मानले.
संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी विद्यापीठ रा से यो संचालक डॉ राजेंद्र वडजे,संचालक मल्लिकार्जुन मसुती, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, ज्युनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, माजी प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, समन्वयक मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी उपक्रमाचे कौतुक केले.