गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३७ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक या कार्यक्रमाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून,  ११ जुलै ते २१ जुलै २०२४ पर्यंत आयोजन

कार्यक्रम

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३७ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक या कार्यक्रमाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून,  ११ जुलै ते २१ जुलै २०२४ पर्यंत आयोजन

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबध्द मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनिय व नेत्रदीपक प्रगतीची वाटचाल करीत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३७ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक या कार्यक्रमाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून, दि. ११ जुलै ते २१ जुलै २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सदरची पत्रकार परिषद अन्नछत्र मंडळात संपन्न झाली.*

HTML img Tag Simply Easy Learning    

दि. ११ जुलै रोजी गुरुवार सायंकाळी ६.३० मिनीटानी कार्यक्रमास प्रारंभ होणार असून, अक्कलकोट विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी, प.पू.श्री मोहन पुजारी – मुख्य पुजारी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, वे.शा.सं.श्री अण्णू महाराज –पुजारी श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट, तहसिलदार विनायक मगर, अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावर, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकरराव कवितके, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थाचे प्रतिमाचे पूजन, दिप प्रज्वलनाने सदर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

 दि. ११ जुलै रोजी गुरुवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत नक्षत्रांचे देणे, थोर संगित दिग्दर्शक व गायक पद्मश्री पंडीतजी ह्रदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

 दि. १२ जुलै रोजी शुक्रवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘एक भाव मैफिल’ स्वर आर्या लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते आर्या आंबेकर व सहकलाकार मुंबई यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

 दि. १३ जुलै रोजी शनिवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडीयेला’ (खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी) हा कार्यक्रम होणार आहे.

 दि. १४ जुलै रोजी रविवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या शुभाशिर्वादाने सादरकर्ते कर्नाटकचे ख्यातनाम गायक राजेश कृष्णन व Zee कन्नड वाहिनीच्या प्रसिध्द निवेदिका अनुश्री आणि सहकारी बेंगळूर यांचा ‘संगीत संजे’ कन्नड कार्यक्रम सादर होणार आहे.

 दि. १५ जुलै रोजी सोमवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान सादर होणार आहे.

 दि. १६ जुलै रोजी मंगळावर सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘किर्तन’ राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांचा कार्यक्रम होणार आहे.

 दि. १७ जुलै रोजी बुधवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत महाराष्ट्राचे हास्य जत्रा सादरकर्ते समीर चौगुले, ओंकार राऊत, ईशा डे, प्रसाद खांडेकर, चेतन भट, अरुण कदम, प्रभाकर मोरे, वनित खरात, नम्रता संभेराव, शाम राजपूत, पृथ्वीक प्रताप यांचा धमाल उडवणारा कार्यक्रम होणार आहे.

 दि. १८ जुलै रोजी गुरुवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘स्वर संध्या’ सादरकर्ते – महेश काळे आणि सहकारी, पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे.

 दि. १९ जुलै रोजी शुक्रवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘भक्तिरंग’ भक्तिगीते, भावगीते व नृत्य सादरकर्ते संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे.

 दि. २० जुलै रोजी शनिवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सुर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे.

 दि. २१ जुलै रोजी गुरूपौर्णिमे निमित्त रविवारी सकाळी ७ ते ९ पर्यंत महाप्रसादगृह येथे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वा. खालील मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानवैद्य दाखविण्यात येणार आहे.

*⭕चौकट :*
*नूतन महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ :*
दि. २१ जुलै रोजी रविवार सकाळी ११ वा. गुरूपौर्णिमे निमित्त नियोजित ५ मजली भव्य अशा महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सोलापूरचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील, राज्य अधिस्वीकृती समिती, महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष व दै.लोकमत, मुंबईचे सहयोगी संपादक यदुभाऊ जोशी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, कायदेविषयक सल्लागार व जेष्ठ विधिज्ञ अँड. नितीन हबीब सोलापूर, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, कैलास वाडकर (देणगीदार व पालखी संयोजक शिरवळ, पुणे), अतुल शिंदीकर (देणगीदार, ठाणे प.) यांच्या हस्ते आणि अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.

*⭕चौकट :*
*एक दृष्टिक्षेप- नव्याने बांधण्यात येणाऱ्या नियोजित महप्रसादगृहाच्या वास्तूवर :*
नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत, भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सदर इमारतीचे बांधकाम करण्याची पुर्वतयारी झाली असुन, ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे. या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. सदर इमारतीस नगरपालिकेची रीतसर बांधकाम परवानगी घेतली आहे आणि अल्पावधीतच या इमारतीचे बांधकाम सुरू करण्याचा मानस आहे.

दि. २१ जुलै रोजी रविवार सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद, सायं ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या भव्य मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात आणि अतुल बेहरे पुणे यांच्या ‘नांदब्रम्ह’ या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ बाळासाहेब दाभेकर –अध्यक्ष भरत मित्र मंडळ पुणे,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. मा.स्थायी समिती चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे, कासुर्डी (खे), ता.भोर, जि. पुणेचे देणगीदारसंतोष कोंडे यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

दि. १९ जुलै ते २१ जुलै पर्यंत ‘रक्तदान शिबीराचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व निवेदन श्वेता हुल्ले या करणार आहेत. तरी सदरच्या कार्यक्रमाचा लाभ महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि अन्य राज्य व परदेशातील स्वामी भक्तांनी घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी केले आहे. यंदाच्या वर्षी सदरचे कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे हे २५ वे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

सध्या आषाढी वारी निमित्त दररोज हजारों स्वामी भक्त अन्नछत्र मंडळात येत आहेत. उभी स्वामींची मुर्ती, महाप्रसादगृह, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, वाटिका व बालोउद्यान, शिवचरित्र धातू शिल्प प्रदर्शन हे पाहण्यासाठी स्वामी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. यात्री निवास, यात्री भवन, प्रशस्त वहानतळ स्वामी भक्तांनी गजबजलेले व फुलून गेले आहेत.

न्यासाकडून अग्निशामक व रुग्णवाहिकेचा देखील उत्तम सोय केलेली आहे. याबरोबरच तयार केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत
• पाणी आडवा -पाणी जिरवा -पाण्याचा अपव्यय टाळा.
• पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन करा.
• स्वच्छता अभियान राबवू भारत -महाराष्ट्र अक्कलकोट स्वच्छ करू.
• बेटी बचाओ-बेटी पढावो.
• पाणी हे जीवन आहे.
• स्त्रीभ्रुण हत्या टाळा.
• आपला अन्नछत्र -स्वच्छ अन्नछत्र हा संदेशामुळे विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. न्यासाला देणगीदारास आयकरात ८० – जी कलमान्वे सवलत आहे.

*⭕चौकट :*
*गुणीजन व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार :*
दि. ११ जुलै ते २० जुलै दरम्यान गुणीजन व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार व सत्कार हे सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

*⭕चौकट :*
*विशेष सहकार्य :*
नागपूरचे उद्योगपती आशिष फडणवीस, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, सोलापूरचे कायदेविषयक सल्लागार व जेष्ठ विधिज्ञ अँड. नितीन हबीब, पुणेचे चार्टर्ड अकाऊंटट महेश गावसकर यांचे विशेष सहकार्य आहे. याबरोबरच श्री स्वामी समर्थ समाधी मठ – समस्त पुजारी मंडळ, बुधवार पेठ अक्कलकोट, सर्व प्रसार माध्यमे, पत्रकार, अक्कलकोट नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी, उत्तर व दक्षिण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, अरविंद शिंदे, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, अँड. संतोष खोबरे, अमोलराजे मित्र मंडळ, जयहिंद फूड बँक व रॉबीनहुड आर्मी अक्कलकोट, न्यासाचे विश्वस्त, क्रियाशील सभासद, सेवेकरी व कार्यकर्ते यांचे सहकार्य असते.

*⭕चौकट :*
*समर्थ महाप्रसाद सेवा :*
अक्कलकोट शहरातील निराधार, दिव्यांग व गरीब-गरजूंना दैनदिन दोन्ही वेळेचे जेवण डब्यातून पुरविण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आल्या प्रमाणे लाभार्थ्यांच्या पत्त्यावर सदर जेवणाचा डबा दररोज २५० जणांना देण्यात येतो. याबरोबरच समर्थ महाप्रसाद सेवाच्या लाभार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.

*⭕चौकट :*
*कुस्तीगरांसाठी दर महा खुराकाचे कीट वाटप :*
तालुक्यातील कुस्तीगीर हे सरावाकरिता कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदि ठिकाणी कुस्तीचा सराव करीत आहेत. मात्र त्यांची गरज ओळखून तालुक्याच्या चांद्या पासून बांध्यापर्यंतच्या कुस्तीगरांचा एका विशेष टीमच्या माद्यमातून सर्वे करून तालुक्यातील ७६ पैलवानांची निवड करण्यात आली आहे. न्यासाकडून प्रसाद रुपी खुराकाचे वाटप प्रती महिन्यास करण्यात येत आहे. या कीटमध्ये कुस्तीगीरांना आवश्यक तूप, बदाम, खारीक, बडीसोप, खसखस, इलायीची, धने आदि पदार्थांचे कुस्तीगरांसाठी या जीनंसांचा समावेश आहे.

या पत्रकार परिषदेस मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, वास्तुविशारद योगेश अहंकारी, मनोज निकम, अभियंता किरण पाटील, संतोष भोसले, अमित थोरात, व न्यासाचे विश्वस्त, क्रियाशील सभासद, सेवेकरी व कार्यकर्ते हे उपस्थित होते.
——————-//——————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button