गावगाथा

*_हत्तीकणबस येथे अनोखा आनंदसोहळा संपन्न…_*

*_हत्तीकणबस येथील मा. तंटामुक्त अध्यक्ष श्री. बसवराज माणिक बिराजदार यांनी आपल्या लाडक्या नातवांचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेला देणगी देऊन केला साजरा..._*

*_हत्तीकणबस येथे अनोखा आनंदसोहळा संपन्न…_*
*_हत्तीकणबस येथील मा. तंटामुक्त अध्यक्ष श्री. बसवराज माणिक बिराजदार यांनी आपल्या लाडक्या नातवांचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेला देणगी देऊन केला साजरा…_*
*_चि. प्रद्युम्न पंडित बिराजदार आणि प्रज्ञा मल्लिनाथ बिराजदार या दोन नातवांचा पहिलाच वाढदिवस आपल्या परिवाराचा हा आनंदसोहळा साजरा करताना अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी रुपये 5000/-ची देणगी देवून हा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला._*
*_शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सर्व स्टाफला शुभेच्छाही दिल्या. इयत्ता पहिली पासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू केल्याच्या आनंदात त्यांनी आपल्या नातवांचा पहिला वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत शाळेतच साजरा करण्याची भावना व्यक्त केली. याशिवाय पुढील पाच वर्ष हा वाढदिवस सोहळा शाळेला 5000/- रुपये देणगी देऊन साजरा करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या दानशूर वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या वृत्तीचा इतरांनीही आदर्श घ्यावा अशी चर्चा गावात रंगली आहे._*
*_शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान असावा असे म्हटले जाते. याचा प्रत्यक्ष अनुभव या आनंद सोहळ्याला गावचे सरपंच श्री. श्रीशैल माळी साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. देवेंद्र बिराजदार, उपाध्यक्ष श्री. पंचप्पा घोडके, श्री. गुरुअण्णा उण्णद (ग्राम पंचायत सदस्य), माजी सरपंच श्री. गायकवाड, श्री. संजय हिरापुरे (ग्राम पंचायत सदस्य), अंगणवाडी सेविका सौ. नंदर्गी मॅडम, सौ. धडके मॅडम, कुंभार ताई व अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते._*
*_हा आनंदसोहळा साजरा करण्याचे नियोजन शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री. इस्माईल मुर्डी सर यांनी विशेष परिश्रम घेतले. गावातील पालकांनी शाळेच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे, पालक शाळेचा आधारस्तंभ आहेत अशी भावना श्री. इस्माईल मुर्डी सर यांनी व्यक्त केली. गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून शाळा आणि पालक यांच्यात अतूट नाते निर्माण करण्यात श्री. मुर्डी सर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हा आनंद सोहळा साजरा करण्यात शाळेतील शिक्षिका सौ.उषा गायकवाड, प्रभारी मुख्याध्यापक श्री. शिवानंद मंगरूळे, तसेच शिक्षक श्री.राजाराम सुरवसे, श्री.अरुण पांचाळ, श्री.शितल डावरे, श्री.विक्रम जाधव सौ.बबिता कोरेकर यांनी परिश्रम घेतले._*
*_सदर आनंदसोहळा कार्यक्रम अक्कलकोट तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रशांत आरबळे साहेब, मैंदर्गी बीटचे विस्तार अधिकारी श्री. सोमशेखर स्वामी साहेब, हत्तीकणबस केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. सुरेश शटगार यांनी अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगितले._*

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button