मोशन फिल्म स्टुडिओचे संचालक आणि सुप्रसिद्ध फिल्म एडिटर सचिन जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने सत्कार…
सत्कार सन्मान

मोशन फिल्म स्टुडिओचे संचालक आणि सुप्रसिद्ध फिल्म एडिटर सचिन जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने सत्कार…
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा 37 वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि लाखो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीमकृपेने, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शन आणि प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ हे ३७ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करुन नेत्रदीपक वाटचाल करीत आहे. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यास च्या वतीने, नव्याने बांधण्यात येणाऱ्या भव्य 5 मजली नूतन महाप्रसाद गृहाच्या वास्तूचे भूमिपूजन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे मुख्य पुरोहित मोहन पुजारी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, राज्य अधिस्वीकृती समिती, महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष व मुंबईचे जेष्ठ पत्रकार श्री व सौ. यदुभाऊ जोशी, कायदेविषयक सल्लागार व जेष्ठ विधिज्ञ अँड.नितीन हबीब सोलापूर आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सोलापूर येथील मोशन फिल्म स्टुडिओ च्या वतीने अन्नछत्र मंडळाच्या गेली 37 वर्षांच्या अन्नदान सेवा कार्याविषयी सर्वसमावेशक माहिती देणारी आणि नियोजित वास्तूवर प्रकाश टाकणारी डॉक्युमेंट्री फिल्म बनविण्यात आली आहे. आणि या सर्व उपस्थितांन समोर ही डॉक्युमेंट्री फिल्म दाखविण्यात आली तसेच अन्नछत्रातील भक्तांना हॉल मध्ये 2 मोठ्या स्क्रीन वर पाहण्यासाठीची सुविधा पण करण्यात आली आहे…
याच कार्याची दखल घेत, सोलापूर येथील मोशन फिल्म स्टुडिओचे संचालक आणि सुप्रसिद्ध फिल्म एडिटर श्री सचिन जगताप यांचा सन्मान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले आणि अमोल राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
या डॉक्युमेंट्री फिल्म ची निर्मिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यास अक्कलकोट यांची असून, दिग्दर्शन आणि व्हिडीओ एडीटींग सचिन अशोक जगताप मोशन फिल्म स्टुडीओ, सोलापुर यांनी केले आहे.
स्क्रिप्ट चे लेखन श्रुती कुलकर्णी – पात्रुडकर यांनी केले आहे.
तर निवेदन ऋतुराज कुलकर्णी आणि स्नेहांकीता देवगेकर- घाडगे यांनी केलंय..
3डी ऍनिमेशन पुणे येथील विजय पवार, आर्किटेक्ट योगेश अहंकारी यांचे आहे,
तर छायचित्रण संदीप चौहान आणि ड्रोन शुटिंग सिद्धेश्वर पुजारी यांनी केलं असून, या सर्वांच्या सहभागातून एक उत्तम अशी डॉक्युमेंट्री फिल्म बनवण्यात आली आहे… त्यामुळे सचिन जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं विशेष कौतुक केले जात आहे… स्वामी भक्तांना पाहण्यासाठी ही डॉक्युमेंट्री फिल्म सर्वच सोशल मीडिया वर उपलब्ध आहे…