Akkalkot: दाक्षिणात्य ख्यातनाम जेष्ठ अभिनेते श्रीनिवास मुर्ती यांनी घेतला अक्कलकोट स्वामींचे दर्शन

अक्कलकोट (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले न्यासाचे कार्य कर्नाटक राज्यात देखील नांव लौकिक असल्याचे मनोगत कर्नाटकाचे जेष्ठ ख्यातनाम अभिनेता श्रीनिवास मूर्ती यांनी व्यक्त केले.


ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता, मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत राजशेखर उमराणीकर, महेश मेत्री, विद्याधर गुरव, बसवराज धनशेट्टी, प्रशांत बिराजदार, गुरुराज मठपती हे उपस्थित होते.


याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, सौरभ मोरे, निखिल पाटील, बाळासाहेब पोळ, प्रथमेश पवार, गोटू माने, प्रवीण घाटगे, संजय गोंडाळ, किरण जाधव, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.