Akkalkot Rural: अनंत चैतन्य प्रशाला, हन्नूर येथे 78 वा भारतीय स्वातंत्र्य दिवस विविध उपक्रमाने साजरा

अक्कलकोट (प्रतिनिधी ): ब्रिटिशांच्या जुलमी, मनमानी कारभाराला झुगारून स्वतः चे अस्तित्व टिकवून ठेवावयाचे असेल तर स्वातंत्र्य हवा या एकाच भावनेतून ” शक्ती, भक्ती व आपापल्या युक्ती ने योगदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या भारतीयांच्या त्यागाचा, बलिदानाचा ,स्थैर्य,धैर्य,सत्य,गतिमानता,हरितक्रांतीचा प्रतीक असलेल्या “तिरंगा ध्वज ” फडकवून हा स्वातंत्र्य पर्व अतिशय उत्साही वातावरणात संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.

त्याच अनुषंगाने आज महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व सेमी इंग्लिश प्राथमिक शाळा,हन्नूर येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. प्रारंभी हन्नूर गावच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. शांताबाई परमेश्वर फसगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर प्रशालेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

यानंतर कु. शिवानी बाळशंकर हिने व कु. भाग्यश्री पाटील, सायली पवार, सिफा बागवान या मुलींनी तसेच सेमी इंग्लिशच्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतावर अतिशय सुंदर नृत्य सादर केले. यानंतर प्रशालेच्या, सेमी इंग्रजी व जि. प. प्राथमिक मराठी केंद्र शाळा, हन्नूर च्या मुलां- मुलींची सुरेख भाषणे झाली.यानंतर या सर्व भाषणातील विद्यार्थ्यांना मेजर राजेंद्र मल्लप्पा भरमशेट्टी यांनी तर नृत्य सादर केलेल्यांना हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते मा. सागरदादा कल्याणशेट्टी यांनी रोख पारितोषिक देऊन गौरवले.यावेळी माध्यमिक व उच्च शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक व इ. ५ वी ते ९ वी त प्रथम व शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना कल्याणशेट्टी, मुल्ला, पत्की, बिराजदार, कलबुर्गी, जकीकोरे, पाटील,सैदे, हताळे कुटुंबियांकडून ठेवण्यात आलेले रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे माजी प्राचार्य सिद्धेश्वर कल्याणशेट्टी सर होते. याप्रसंगी गावातील विविध मान्यवर,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविस्तारअधिकारी थोरात, तंटामुक्त अध्यक्ष,माजी उपसरपंच,जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, आशावर्कर्स, अंगणवाडी सेविका,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत राठोड व शिक्षकवृंद,प्रशालेचे माजी मुख्याध्यापक चंद्रकांत व्हनमाने, अशोक दंतकाळे, विलास बिराजदार, सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ चव्हाण, निंगप्पा बिराजदार, सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक विलास तळवार, कनिष्ठ लिपिक अब्दुलकरीम मुल्ला, प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक साखरे, पर्यवेक्षक ज्ञानदेव शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अप्पासाहेब काळे,ज्युनियर विभाग प्रमुख प्रा. रविंद्र कालीबत्ते,सेमीविभाग प्रमुख शशिकांत अंकलगे,संगीतशिक्षक सुरेश जाधव,कलाशिक्षक राजेंद्र यंदे तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक,सेमी चे समस्त शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सौ. मल्लमा चप्पळगाव यांनी केले तर आभार सौ. स्वप्नाली जमदाडे यांनी मानले.
