Satara : राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी साताऱ्याची कन्या जानवी दुधगी हिची निवड

सातारा (प्रतिनिधी): रत्नागिरीच्या डेरवण येथे होणाऱ्या सब ज्युनियर राज्य अजिंक्य पद धनुर्विद्या स्पर्धेसाठी साताऱ्याची कन्या जानवी दुधगी हिची निवड करण्यात आली आहे.

कुमारी जानवी ही साताऱ्यातील कोडोली, चंदन नगर येथे वास्तव्यास असून ती सध्या दृष्टी आर्चरी अकॅडमी येथे धनुर्विद्येचा प्रशिक्षण घेत आहे. तिने जिल्हा धनुर्विद्या संघटना व शिवांतीका आर्चर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सब ज्युनिअर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत ‘इंडियन’ या प्रकारात चमकदार कामगिरी केली. जानवीच्या याच कामगिरीमुळे तिची दि. १ मार्च रोजी डेरवण रत्नागिरी येथे होणाऱ्या सब ज्युनियर राज्य अजिंक्य पद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जानवीला प्रवीण सावंत , शिरीष ननवरे व सायली सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल न्यू इंग्लिश मीडियम स्कूल कोडोली शाळेचे मुख्याध्यापक माधवी रवींद्र जाधव व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.
