वळसंग येथे स्वामी समर्थ सेवा मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
वळसंग : प्रतिनिधी
वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने गावातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पंचायत समिती दक्षिण सोलापूरचे सदस्य बलवान गोतसुर्वे, माजी जिल्हाधिकारी तथा यशदाचे समन्वयक मा. मल्लिनाथ कलशेट्टी, वळसंग गावचे सरपंच जगदीश अंटद, स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीशैल दुधगी, सचिव सिद्धाराम काळे, उपसरपंच समीर कटरे, ग्रामपंचायत सदस्य सालम अमलीचुंगे, दाऊद अमलीचुंगे, सिद्धाराम कोडले, शिवशरण म्हेत्रे, मुख्याध्यापक वीरेश थळंगे, दिनकर नारायणकर, अल्ताफ पटेल, खंडू शिंदे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके, तानाजी जमादार आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
या सत्कार समारंभात श्री शंकरलिंग प्रशालेतील इयत्ता दहावी परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेले मानसी खैराटे, अक्षता माणकोजी, वैष्णवी कलशेट्टी, कनिष्का शिवशिखरे, सृष्टी खैराटे, श्रीधर ढब्बे, छाया पवार, अनिकेत ढब्बे, मयुरी पारे, प्रगती जाधव, सोनाली पाटील, तेजस्विनी व्हनकडे, तेजस्विनी ख्याडे, रिशी किणगी, सुरेश चौगुले, ऐश्वर्या पावले, प्रथमेश यागंटे यांचा गौरव करण्यात आला. तसेच उमदा उर्दू प्रशाला, वळसंग येथील विशेष मानकरी विद्यार्थी सादिया जमादार, जिलानबी मुल्ला, आयेशा कुरेशी तसेच इयत्ता बारावीतील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थीनी आलिशा अमलीचुंगे, प्राजक्ता माने आणि महेक बागवान यांचाही शाल, प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास वळसंग गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शंकरलिंग प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!