नाविंदगीत ख्वाजा पिर यतिमशावली उरूस निमित्त सुप्रसिद्ध गायिका विद्याश्री मसिकनाळ यांचे कार्यक्रम ; भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन

नाविंदगी (प्रतिनिधी दयानंद गौडगांव): अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथे हजरत ख्वाजा पिर यतिमशावली उरूस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ मे पासून उरूस प्रारंभ होत असून पारंपरिक चिराग , संदल यांसह भाविकांच्या मनोरंजनासाठी विविध कला गायनांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तर कर्नाटकातील सुप्रसिद्ध भावगीत गायिका आणि समाजप्रबोधनकार विद्याश्री मसिकनाळ यांचे कार्यक्रम तसेच सुप्रसिद्ध गायक मौलासाब मुल्ला यांच्या गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाची रुपरेषा खालीलप्रमाणे :
दि.२७ मे , गुस्ल
दि. २८ मे, संध्याकाळी सात वाजता, संदल (गंध),
दि. २९ मे, चिराग, सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुप्रसिद्ध गायिका विद्याश्री मसिकनाळ तसेच सुप्रसिद्ध गायक मौलासाब मुल्ला यांच्या गायनाचे कार्यक्रम,
त्यासोबतच सर्व भाविक आणि गावकरी बांधवांसाठी दुपारी १२ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत शाकाहारी महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.



