मातापित्यांनो प्रथम आपल्या मुलीकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे – श्रवण जंगम
प्रथम आपण स्वतः आचरणास सुरुवात करावी – गुरु सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज
परभणी जिल्हा जंगम समाज मेळावा संपन्न!

परभणी (प्रतिनिधी) :- परभणी येथील जगद्गुरु पलसिद्ध स्वामी सेवाश्रम येथे परभणी जिल्हा जंगम समाज मेळावा राष्ट्रीय जंगम समाज संघटना व परभणी जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 मे 2026 रविवार रोजी ठिक 11 वाजता आयोजित कार्यक्रमात रक्तदान, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, बाल विकास व संगोपण, धोंडे जेवन, उद्योग व आध्यात्मिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम आणि परभणी जिल्हा वधु वर नोंदणीसह संपन्न झाला, कार्यक्रमाचे उद्घाटक श्री गुरु ष.ब्र. 108 सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रवण जंगम राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय जंगम समाज संघटना, प्रमुख उपस्थितीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रमुख वक्ते मनोहर भोळे स्वामी, बाल विकास व संगोपन मार्गदर्शक प्रा.विशाला पटनम, उद्योग विकास मार्गदर्शक मिलिंद वालवाडकर, चंद्रशेखर हुंडेकरी, त्र्यंबक पटवेकर, त्रंबक स्वामी कपाळे, बसवराज स्वामी, राजकुमार मठपती, श्रीशैल्य स्वामी, संगमेश्वर स्वामी, सुनील कबाडे व अरुण पेडगावकर परभणी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय जंगम समाज संघटना विचार मंचावर उपस्थित होते, प्रथम सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पंच जगद्गुरु व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, विचार मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत राष्ट्रीय जंगम समाज संघटना परभणी जिल्हा व सर्व तालुका समन्वयक आदींच्या हस्ते शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले, प्रास्ताविक अरुण पेडगावकर यांनी केले तर श्री गुरु ष.ब्र. 108 सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांनी आशीर्वाचन आपल्या मुलांना व मुलीला संस्कार ही आचरणातून मिळतात प्रथम आपण स्वतः आईने व वडिलांनी आचरणात सुरुवात करावी पुढील पिढी दर पिढी संस्कार घडतात, लिंग धरणा करावी, दररोज पूजा करावी, कपाळी त्रिपुट भस्म लावावा, गुरुमंत्र जप करावा, दीक्षा स्वतः घ्यावी व नंतर मुला-मुलींना द्यावी, अनेक उदाहरणातून स्पष्ट केले तसेच आयोजकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रमुख वक्ते मनोहर भोळे स्वामी मार्गदर्शन करताना विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या पालकांनी काय आचारसंहिता पाळायला पाहिजेत तसेच समाजाने व पालकांनी त्या विद्यार्थी व विद्यार्थीनीस अभ्यासासाठी पुस्तकांची व साहित्याची सोय करावी, विद्यार्थी व विद्यार्थिनी हे स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम असेल तरच त्यामध्ये झोकुन अभ्यास करावा, नाहीतर वेळ वाया घालवू नये असे अनेक उदाहरण देऊन सांगितले, श्रवण जंगम राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय जंगम समाज संघटना बोलताना माता-पितानो प्रथम आपल्या मुलीकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे, आपण घरी मुली शिकायला मोठ्या शहरात, लव्ह जिहाद सारखे प्रकरण सर्व समाजात दररोज घडत आहेत, त्यामध्ये आपला समाज दुसऱ्या स्थानी आहे, त्याचे कारण आपल्या समाजाच्या मुली सरळ साध्या भोळ्या, लवकर आकर्षित करता येतात, त्यासाठी लक्ष देणे गरजेचे झाले आहे, अनेक उदाहरणातून स्पष्ट केले, बाल विकास व संगोपन मार्गदर्शक प्रा.विशाला पटनम मुला मुलींच्या सर्वांगीण विकासाचा प्रात्यक्षिकासह पंचतत्वाचे स्पष्टीकरण तसेच विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले, या सत्रा नंतर दुपारचे धोंडेजेवण कार्यक्रम संपन्न झाला ततनंतर उद्योग विकास मार्गदर्शक मिलिंद वालवाडकर समाज बांधवांनी उद्योगाची निवड उद्योग कल्पना व भांडवल याचा सारासार विचार करून आपला उद्योग उभारावा, समाज बांधवांनी आपल्या उद्योग उभारणीसाठी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या वतीने मी सांगतो की आमचे फोन 365 दिवस 24 तास तुम्हाला सहकार्य करण्यासाठी उपलब्ध आहोत, कधीही रात्री बै रात्री मार्गदर्शन करण्यासाठी फोन करा असे सांगितले, श्री गुरु ष.ब्र. 108 अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर व श्री गुरु ष.ब्र. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांनी समारोपीय आशीर्वाचनात जंगम कोण आहोत? प्रथम आपले आपण ओळखा, आपला धर्म, आपले संस्कार, हे आपन प्रथम आचरणात आणावेत तसेच जंगम पुरोहित मंडळींनी एकत्र येऊन सर्व विधी समान पद्धतीने एकसारख्या कराव्यात त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करण्यास तयार आहोत सात दिवसाचे शिबिर चार दिवस लिखाण व तीन दिवस प्रात्यक्षिकासह सर्व पूजा विधी एक समान झाल्या पाहिजेत असे सांगितले व राष्ट्रीय जंगम समाजाच्या प्रत्येक कार्यात आम्ही सदा उपलब्ध राहूत अशी ग्वाही देऊन अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या, आभार श्रीकांत स्वामी यांनी मांनले तर सूत्रसंचालन संभाजीआप्पा शेवटे यांनी केले, सदरच्या कार्यक्रमात सर्व तालुका समन्वयक सर्व जंगम समाज बांधव, भगिनी, बालगोपाला सह मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव प्रमुख श्रीकांत स्वामी, शिवरूद्र स्वामी, किरण वसमतकर, संदीप पात्रेकर, संजय स्वामी बोरकर, अमित मठपती, रवी स्वामी, अनिल स्वामी, संजय स्वामी, रुपेश वसेकर आदिंनी परिश्रम घेतले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!