गावगाथा

अन्नछत्र मंडळाचे कार्य देशासाठी प्रेरणादायी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार

विविध उपक्रमांची माहिती घेतली

अन्नछत्र मंडळाचे कार्य देशासाठी प्रेरणादायी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार

अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली महाप्रसाद सेवा, विविध सामाजिक उपक्रम तसेच पर्यावरणपूरक कार्य हे उल्लेखनीय व प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री Nitin Gadkari यांनी काढले. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अन्नछत्र मंडळ हे धार्मिक, सांस्कृतिक आणि सेवाभावाचे प्रतीक बनल्याचेही त्यांनी नमूद केले.

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळास भेट दिली असता आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते ना. गडकरी यांचा श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी खासदार ज्योतीताई वाघमारे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, महापौर विनायक कोंड्याल, सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, ना. गडकरी यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब ठेंग, मनोज वाडेकर, दीपक शिंदे, अमोल बिराजदार, एनएचए पुणे प्रकल्प संचालक संजय कदम, स्वप्नील कासार, गुरुशांत धुत्तरगावकर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, दीपक वाघमारे, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, अक्कलकोट भाजपा मध्य मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना Nitin Gadkari यांनी सांगितले की, “गडकरी कुटुंब हे श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी स्वामी भक्त असून अन्नछत्र मंडळ हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे. न्यासाच्या वतीने पर्यावरणपूरक पद्धतीने वसुंधरेची जपणूक केली जात असल्याचे समाधान वाटते.” त्यांनी समर्थ महाप्रसाद सेवेची माहिती जाणून घेत न्यासाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चौकट : इलेक्ट्रिक बग्गीतून प्रवास

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी Nitin Gadkari यांच्यासाठी विशेष इलेक्ट्रिक बग्गीची व्यवस्था केली होती. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथून अन्नछत्र मंडळापर्यंत दोन इलेक्ट्रिक बग्ग्यांद्वारे ना. गडकरी व मान्यवरांना आणण्यात आले. या पर्यावरणपूरक सुविधेचे कौतुक करताना ना. गडकरी यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या आवाहनाला अक्कलकोट नगरीतून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. गरज ओळखून न्यासाने केलेल्या या सुविधेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, सौरभ मोरे, मनोज निकम, अप्पू पुजारी, प्रवीण देशमुख, विजय माने, सुमित घाडगे, शुभम सावंत, प्रसाद मोरे, साहिल सय्यद, सागर जाधव, किरण साठे, ज्ञानेश्वर भोसले, बाळासाहेब पोळ, धानाप्पा उमदी, विनायक भोसले, नुर खासबागदार, स्वामिनाथ बाबर, मल्लिकार्जुन गवळी, बसवराज निंबाळे, विलासराव रेड्डी, बसवराज क्यार, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, सिद्धराम कल्याणी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, समर्थ चव्हाण, कल्याण देशमुख, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, गोरख माळी, पप्पू कोल्हे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button