स्वामी समर्थांची माझ्या जीवनावर मोठी कृपा – सिव्हील सर्जन डॉ.सुहास माने
डॉ.सुहास माने यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.


स्वामी समर्थांची माझ्या जीवनावर मोठी कृपा – सिव्हील सर्जन डॉ.सुहास माने

(प्रतिनिधी अक्कलकोट, )
अनेक भाविकांची श्रद्धा स्वामी समर्थावर असते तशी माझीही निस्सीम श्रद्धा श्री स्वामी समर्थांवर आहे. स्वामी समर्थांचे नामस्मरण माझ्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. जीवनातील सर्वच सुख-दुःख प्रसंगी या स्वामींच्या नाम चिंतनाने नेहमीच तारले आहे. शुद्ध अंतकरणाने स्वामींचे नामस्मरण केल्यास त्यांची कृपारुपी सावली नेहमीच आपल्या जीवनावर असते असे सांगून स्वामी समर्थांची माझ्या जीवनावर मोठी कृपा असल्याचे मनोगत सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास माने यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी डॉ.सुहास माने यांचा वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी डॉ.सुहास माने बोलत होते. यावेळी वटवृक्ष मंदिरातील सुंदर व रमणीय परिसर पाहून जीवन धन्य झाले असेही
भावोद्गार डॉ.माने यांनी काढले. यावेळी
अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी बनसोडे, स्वप्नील ढगे, जगन्नाथ ढगे, हुसेनबाशा मुजावर, परतरेड्डी गवंडी, शिवशरण अचलेर, मंदिर समितीचे पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, चंद्रकांत सोनटक्के, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – डॉ.सुहास माने यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
