आध्यात्माच्या उन्नतीकरीता डोंबीवली-बदलापूरकरांची भक्ती आदर्शवत – महेश इंगळे
वटवृक्ष मंदिरात डोंबिवली-बदलापूर स्वामी भक्त मंडळींचे धार्मिक कार्यक्रम संपन्न.

आध्यात्माच्या उन्नतीकरीता डोंबीवली-बदलापूरकरांची भक्ती आदर्शवत – महेश इंगळे

डोंबिवली बदलापूरकरांच्या ९४ व्या मासिक सेवेनिमित्त व्यक्त केले मनोगत

- वटवृक्ष मंदिरात डोंबिवली-बदलापूर स्वामी भक्त मंडळींचे धार्मिक कार्यक्रम संपन्न.
(प्रतिनिधी अक्कलकोट,दि.२२/११/२०२२)
सद्गुरु चैतन्यस्वरूप श्री.अण्णा लिमये यांच्या श्री स्वामी समर्थ नामाचा प्रचार आणि प्रसार या कार्याअंतर्गत जप, नामस्मरण, किर्तन भजन, गायन या सेवा म्हणजे अध्यात्मिक उन्नती सोबत स्वामी सेवकांसाठी मनोरंजनाचे हक्काचे व्यासपीठ हे ध्येय समोर ठेवून अक्कलकोट मासिक किर्तन सेवेचे आयोजन डोंबिवली बदलापूर स्वामी भक्त मंडळी दर महिन्याला येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात करीत असतात. त्यांच्या या धार्मिक उपक्रमाची ही ९४ वी मासिक सेवा आहे, म्हणून आध्यात्माच्या उन्नतीकरीता डोंबीवली-बदलापूरकरांची भक्ती आदर्शवत असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कीर्तनकार ह.भ.प.डॉ.सविता मुळे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी वटवृक्ष मंदिरात संपन्न झालेल्या डोंबिवली बदलापूर स्वामीभक्त मंडळाच्या मासिक सेवेच्या शुभारंभी महेश इंगळे बोलत होते. यानंतर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व डोंबिवली बदलापूर स्वामीभक्त मंडळींच्या सयुक्तिक विद्यमाने वटवृक्ष मंदिरात हे कार्यक्रम मंदिर समितीचे चेअरमन आणि विद्यमान नगरसेवक श्री महेशजी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोमदत्त आसोलकर डोंबिवली यांच्या अधिपत्याखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.अक्कलकोट स्वामींच्या कालच्या ९४ व्या मासिक सेवेदरम्यान नोव्हेंबर महिन्याचा जप, नामस्मरण, किर्तन सेवा अक्कलकोट येथे संपन्न झाली. मानसपुजेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष रहाटे आणि भरत दादा यांनी केले.
दुसऱ्या सत्रात संध्याकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत ज्योतिबा मंडप अक्कलकोट येथे ह.भ.प.डॉ.सौ.सविता मुळे औरंगाबाद यांनी सुश्राव्य आणि अभ्यासपूर्ण असे नारदीय कीर्तन सादर केले. तबला वादक सुमेध मुळे व हार्मोनियमवर मयूर स्वामी अक्कलकोट तसेच टाळवादक कु. मुळे यांनी किर्तन कारांना उत्तम साथसंगत करत किर्तन सेवेत आनंददायी भक्तीरस निर्माण केला. या कार्यक्रमास श्रोत्यांनीही मोठी गर्दी केली होती.

फोटो ओळ – वटवृक्ष मंदिरात नारदीय कीर्तन सादरीकरण करताना ह.भ.प.सविता मुळे व अन्य दिसत आहेत.