गावगाथा

*चपळगाव सेमी इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिन संपन्न!*

महिला दिनानिमित्त विशेष

*चपळगाव सेमी इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिन संपन्न!*

चपळगाव, दि.08/03/2024
युनायटेड नेशन्सने 8 मार्च 1975 रोजी दरवर्षी 08 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात केली होती. हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. ग्रामीण विद्या विकास सेमी इंग्लिश स्कूल, चपळगाव येथे या दिनानिमित्त श्रीमती उडचाण मॅडम व उपस्थित सर्व शिक्षिका वर्ग यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रथम सेमी इंग्लिशचे प्रमुख सौ. शिंदे मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत केले.
यावेळी व्यासपीठावर श्रीमती म्हमाणे मॅडम, श्रीमती पाटील मॅडम,पर्यवेक्षक माने सर, CEO नीलकंठ पाटील सर,श्री. जाधव (पालक, दहिटणेवाडी)व दुलंगे सर उपस्थित होते.
श्रीमती कालेखान मॅडम यांनी आपल्या प्रस्ताविकात महिला दिनाचे महत्व व महिलांच्या प्रगतीचे इतिहास सांगितले.
तदनंतर सर्व उपस्थितांचे पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले.
यावेळी नर्सरी ते इ.4 थी वर्गातील विध्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली.
या दिनाचे औचित्य साधून काही चिमुकल्यांनी विविध व आकर्षक अशी वेशभूषा केली होती.

सेमी इंग्लिश मधील गणित विषयाचे सुरवसे मॅडम यांनी महिलांची विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी सांगितले. जिद्द, आत्मविश्वास व प्रयत्न यागुणामुळे महिला आज समाज परिवर्तनाचे महत्वपूर्ण घटक ठरले आहेत,असे नमूद केले.

महिला दिनानिमित्त सर्व विध्यार्थ्यांना स्कूलच्यावतीने खाऊ वाटप करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीमती उडचाण म्हणाले,बदलत्या परिस्थितीसोबत स्वतः मध्ये बदल घडवल्यामुळे महिला आज स्वतःचे समाजात सन्मानपूर्वक अस्तित्व निर्माण केले आहेत.विविध क्षेत्रातील महान कामगिरी केलेल्या थोर महिलांचे जीवन आजही सर्व
स्त्री-वर्गासाठी आदर्श व प्रेरणादायी आहे.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कु.गोविंदे मॅडम व त्यांचे सर्व सहकारी वर्ग आणि मदतनीस नारंगकर मॅडम, डोळळे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे उत्कृष्टपणे सूत्रसंचालन कु. गोविंदे मॅडम यांनी केले तर आभार सौ. उपासे मॅडम यांनी केले.
यावेळी विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👩‍🦰👱‍♀️👷‍♀️👩‍🏫👩‍✈️👩‍🚀👩‍🎨👩‍🔬

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button