गावगाथा

*वस्तुनिष्ठता आणि अचूकता यावरच संशोधनाची उपयोगिता :डॉ. सय्यद अझरुद्दीन*

धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि पदव्युत्तर वाणिज्य विभागातील २०५ सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

*वस्तुनिष्ठता आणि अचूकता यावरच संशोधनाची उपयोगिता :डॉ. सय्यद अझरुद्दीन*
उमरगा (ता.१४) संशोधन हा केवळ माहितीचा संग्रह नसून संशोधनामुळे सामाजिक प्रश्नांची उकल व्हायला मदत झाली पाहिजे, त्यामुळे समाज उपयोगी संशोधन व्हायचे असेल तर संशोधकाने वस्तुनिष्ठता आणि समाज उपयोगिता लक्षात घेतली पाहिजे असे मत छत्रपती संभाजी नगर येथील डॉ . सय्यद अझरुद्दीन यांनी व्यक्त केले. ते कल श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य शाखेद्वारा आयोजित संशोधन पद्धती आणि आराखडा या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होते.
यावेळी प्रोफेसर वाल्मिक सरवदे प्रकुलगुरू डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या उपस्थित या कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले, ऑनलाईन उद्घाटनपर संदेश त्यानी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माकणी येथील प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव हे होते.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात धाराशिव येथील डॉ. सुयोग अमृतराव यांनी संशोधकांनी संशोधनाला सुरुवात करताना माहितीचे संकलन कसे करावे, माहिती संकलनासाठी तयार करण्यात येणारी प्रश्नावली कशी असावी याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टी विकसित करण्यासाठी संशोधन प्रकल्प आणि क्षेत्रीय अध्ययन प्रकल्प हे अनिवार्य करण्यात आले असून ते तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन रुजवावा लागेल, यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरेल असा विश्वास डॉ. संजय अस्वले यांनी यावेळी व्यक्त केला. प्राचार्य घनश्याम जाधव यांनी यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी कार्यशाळेसाठी तुळजापूर येथील प्राचार्य मुकुंद गायकवाड, गुंजोटी येथील डॉ. गुलाब राठोड, प्रा. आर. डी. गायकवाड, डॉ. सहदेव बिराजदार, डॉ. सुधीर पंचगले, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ . विनोद देवरकर, डॉ. वसंत हिस्सल, प्रा. मुरळीकर, प्रा. अक्षता बिराजदार, प्रा. संध्या चौगुले, विजय मुळे, धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि पदव्युत्तर वाणिज्य विभागातील २०५ सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button