ठळक बातम्याजिल्हा घडामोडी
Solapur Loksabha : अखेर सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर ; काॅंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते अशी होणार लढत
सोलापूर प्रतिनिधी दि.२४, बहुचर्चित असलेल्या सोलापूर लोकसभेची भाजपाकडून उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे. राम सातपुतेंना सोलापूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. आज १११ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.


सोलापूर चे विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर या आधी अमर साबळे, शरद बनसोडे, उत्तम जानकर तसेच मिलिंद कांबळे यांची नावे चर्चेत होते. क्षणाक्षणाला राजकीय संकेत बदलत होते, यामुळे भाजपाकडून नेमके कुणाला उमेदवारी मिळणार या संभ्रमात सोलापूरकर होते. आज अखेर त्याला मुहूर्त आला आहे.

दरम्यान भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात लढत होणार आहे.
