वागदरी येथील शिवशरणप्पा सुरवसे यांना राष्ट्रीय अक्कलकोट भूषण आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित …
कै.कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे यांच्या ८ व्या पुण्यस्मरण निमित्त महात्मा अपंग विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या विविध पुरस्कार प्रदान

वागदरी येथील शिवशरणप्पा सुरवसे यांना राष्ट्रीय अक्कलकोट भूषण आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित …

कै.कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे यांच्या ८ व्या पुण्यस्मरण निमित्त महात्मा अपंग विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या विविध पुरस्कार प्रदान

वागदरी — शिवशरणप्पा बाळकृष्ण सुरवसे यांची
अध्यक्षपदी निवड झालेल्या नंतर अक्कलकोट तालुक्यात स्वतः खर्च करून प्रत्येक गावी जाऊन नाभिक समाजाच्या प्रत्येकाच्या घरी दुकानी व वाड्यावस्त्यांवर जाऊ जनगणना करणे , सर्व समाज बांधवांना एकत्र करून समाज बांधवांच्या अडी- अडचणी दूर करणे संघटनेचे महत्त्व समजावून सांगणे प्रत्येक गावात अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवड करून पत्र देणे.तालुक्यातील सर्व गावातील समाज बांधवांची महिती गोळा करून एका हजार जनगणना पुस्तक छापून वागदरी येथे एक हजार समाज बांधवांच्या उपस्थित अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.तालुक्यातील गरीब सलुन दुकानदारांना जिल्हा सेस फंडातून 25 सलुन खुर्ची मिळबून दिले ,तसेच पंचायत समिती कडून पिको- फॉल मशीन सुध्दा मिळवून दिले.
कोरोना काळात तालुक्यात समाज बांधवांना 300 किट ( किराणा मालाचे ) वाटप करण्यात आले.

दहिटणे गावातील श्री गजानन काळे यांचे घराला आग लागून घरातील सर्व वस्तू जळाले होते, त्या जळीत कुटुंब 27000 हजार रुपये व किराणा माल मदत मिळवून दिले. श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा वागदरी व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष निवड नंतर शाळेत प्रत्येक विद्यार्थांना वही-पेन वाटप केले. मित्र मंडळींकडून चौदा हजार रुपयेचे क्रीडा साहित्य दिले.
24000 हजार रुपयाचे मित्र- मंडळींकडून पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले शाळा व्यवस्थापन समिती माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबविले या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे
सदररील कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,त्याप्रसंगी प्रमुख अतिथी पु.ज्योतीषीचार्य ह.भ.प. सागर महाराज देशमुख ( वकील) आळंदीकर अमरावती मा. डॉ शैलेंद्र देवळणकर संचालक उंच शिक्षण विभाग म. नि.प्र. बसवलिंगेश्लर महास्वामीजी विरक्त मठ अक्कलकोट प.पु. अण्णू महाराज प. पु.चोळप्पा महाराज ( समाधी मठ ) यांचे वंशज अक्कलकोट मा. श्री अमोलराजे जन्मेजयराजे भोसले कार्यकारी विश्वस्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट मराठी नाट्य अभिनेते श्री अथर्व कर्वे डॉ शाहीर आझाद नायकवाडी अध्यक्ष व नियोजक मा. डॉ श्री सुनील फडतरे महात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ पक्षिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष श्री सुदर्शन विभुते अक्कलकोट शहर अध्यक्ष श्री लक्ष्मण विभूते उपाध्यक्ष श्री राजेश कोरे सचिव महेश सुरवसे समाज पंच श्री भागवत विभूते श्री प्रभाकर सुरवसे श्री सोमनिंग सुरवसे अक्कलकोट तालुका महिला अध्यक्षा सौ. अनुराधा सुरवसे युवती अध्यक्षा सौ. भाग्यश्री काळे तालुका युवक उपाध्यक्ष श्री नि़गप्पा कोरे श्री श्रीशैल घायाळ उपाध्यक्ष श्री मलु विभूते उपाध्यक्ष श्री दत्ता विभूते उपाध्यक्ष श्री प्रभाकर कोरे श्री बाबूशा सुरवसे सल्लागार श्री बाळकृष्ण कोरे श्री निरंजन सिरसागर श्री सिद्धा विभूते श्री मंगेश घायाळ मैदर्गी शहर अध्यक्ष श्री अनिल विभूते खजिनदार लक्ष्मीपुत्र विभूते सचिव चंद्रकांत विभूते सोलापुरातुन श्री नागेश कोरे श्री अमोगशिद्ध राऊत चि. महादेव कोरे उपस्थित होते.
