कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात “5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन”
शिक्षक दिन

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात “5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन”
—————————————-
*अक्कलकोट:* महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित सौ. सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय, मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अक्कलकोट यांच्यावतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिक्षक दिनानिमित्त दहावीचे विद्यार्थी आज एक दिवस संपूर्ण शाळा मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून विद्यार्थी शिक्षकांच्या नेतृत्वात एकदिवशीय शाळा चालवण्यात आली. यावेळी
अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या जीवनामध्ये एखादा आवडता शिक्षक आणि त्यामुळे जीवनाला कलाटणी कशी मिळाली, याबद्दल आपले स्वतःचे अनुभव विद्यार्थ्यानी आपल्या भाषणातून मांडले. त्याचबरोबर सेमी विभागातील इयत्ता चौथी व सातवीच्या मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित एक सुंदर डान्स परफॉर्मन्स सादर केला. त्याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा .श्री मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना आज शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले व शिक्षक हा विद्यार्थी जीवनामध्ये किती महत्त्वाचा असतो हे अनेक प्रसंगाच्या माध्यमातून त्यांनी मुलांना समजून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक वेदांती मसलेकर हीने केली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून सांस्कृतिक विभागाचे प्रमुख निशिगंधा कोळी व कल्पना स्वामी मॅडम यांनी केले.
यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, शिक्षण विभागाच्या सीईओ सौ .रूपाली शहा, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख पुनम कोकळगी, सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, दिगंबर जगताप, पूजा कडबगावकर, राजकुमार गवळी, सिद्धाराम पाटील, श्रीदेवी मायनाळे, शिवानंद पुजारी, खंडेराव घाटगे आदी शिक्षक उपस्थित होते.
सर्व उपस्थितांचे आभार इयत्ता दहावीतील विद्यार्थी शुभांगी पाटील यांनी केले.
