अक्कलकोट शहरातील विविध विकास कामाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार 19 जानेवारी रोजी संपन्न होणार — आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची माहिती
शुक्रवार, दिनांक 19 जानेवारी रोजी संपन्न होणार

अक्कलकोट शहरातील विविध विकास कामाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार 19 जानेवारी रोजी संपन्न होणार — आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची माहिती

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी) अक्कलकोट शहरातील विविध विकास कामाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 19 जानेवारी रोजी संपन्न होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

अक्कलकोट येथील ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराच्या पुन:र्निर्माणसाठी ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम व अक्कलकोट नूतन बस स्थानकासाठी 29 कोटी रुपये मंजुर झालेल्या बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.


मा.श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे दुपारी 4 वाजता एम.एस.ई.बी चौकात आगमन होणार आहे व एस.टी.स्टँड पर्यंत रोड शो संपन्न होणार आहे.

शुक्रवार,19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता राजे फत्तेसिंह क्रीडांगण ए-वन चौक अक्कलकोट येथे तमाम अक्कलकोट वासियाच्या वतीने मानपत्र देऊन देवेंद्रजी फडवणीस यांची आभार व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच जाहीर सभा होणार असून यास भाजप प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांत बावनकुळे साहेब, पालकमंत्री मा.चंद्रकांत (दादा) पाटील, राज्याचे महसूल मंत्री मा.श्री.बाळासाहेब विखे पाटील, खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, खा. रणजीतसिंह निंबाळकर, मा.आ. सुभाष देशमुख, मा.आ.विजयकुमार देशमुख, मा.आ. राजेंद्र राऊत, मा.आ.राम सातपुते, मा.आ.रणजीतसिंह मोहिते-पाटील, मा.आ.समाधान आवताडे, माजी आ.सिद्रामप्पा पाटील, माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या सह भाजपा महायुतीतील नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे.