*प्रशांत भगरे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती*
निवड नियुक्ती

*प्रशांत भगरे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती*

*🔶अक्कलकोट* दि.१७, (प्रतिनिधी)
*येथील पत्रकार प्रशांत भगरे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यकार्यकारिणी सदस्यपदी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व विश्वस्त किरण नाईक यांच्या सूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी दिली.*

प्रशांत भगरे हे गेल्या २५ वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील दैनिक संचारचे अक्कलकोट तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबईचे माजी संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. निर्भिड पत्रकारितेसाठी त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव केला आहे. परिषदेच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे परिषेदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, डिझिटल महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, मीडिया परिषद अध्यक्ष अनिल वाघमारे, आदींनी अभिनंदन केले आहे.
……
