
सेंट टेरेसा शाळेत सावित्रीबाईंना अभिवादन

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

वांद्रे मुंबई येथील सेंट टेरेसा शाळेत नवीन वर्ष २०२५ मधील पहिला उत्सव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेतील पी टी शिक्षिका संजीवनी गजरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती अभिवादन कार्यक्रम पार पडला.यावेळी उपमुख्यद्यापिका रोझ लोबो यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले तर पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज यांनी पुष्पहार अर्पण केला.इयत्ता आठवीतील विद्यार्थी सखवान शेख याने उपस्थित विद्यार्थी वर्गाला सावित्रीबाईंच्या महान कार्याबद्दल माहिती सांगितली.या शाळेत नेहमीच विविध सण-उत्सव, समारंभ, विशेष दिन आणि इतर अनेक चांगल्या गोष्टी मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
