गावगाथा

स्वप्नांना जागेपणी सत्यात आणू या — प्रा.डाॅ.भीमाशंकर बिराजदार

दिनविशेष

*स्वप्नांना जागेपणी सत्यात आणू या — प्रा.डाॅ.भीमाशंकर बिराजदार
———————————————————
श्रीक्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर)दि.15.झोपेत स्वप्ने पाहण्यापेक्षा जागेपणी स्वप्ने पाहा,आणि ती स्वप्ने पूर्णत्वास नेण्यासाठी जय्यत तयारी करा.असा सल्ला देशवासीयांना देणारे थोर शास्त्रज्ञ, विचारवंत आणि माजी राष्ट्रपती डाॅ.एपीजे अब्दुल कलाम यांनी देशसेवेला अग्रस्थान देणारे महान सुपुत्र होते .घरच्या गरिबीमुळे घरोघर वर्तमान पत्रे टाकून कुटुंबाला मदत करणारे डाॅ.कलाम आपल्या सामर्थ्याने व कर्तृत्वाने राष्ट्रपतीपदावर पर्यंत पोचले .हा प्रवास थक्क करणारा आहे.व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. असे मननीय विचार प्रा.डाॅ.भीमाशंकर बिराजदार यांनी श्री रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालय व श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांकडून डाॅ .एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांकडून करण्यात आले.प्रा.डाॅ.बिराजदार यांनी याप्रसंगी डाॅ.कलाम यांच्या जीवनातील अनेक रोमहर्षक प्रसंग कथन केले.
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,वाचक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button