सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने काम करू – प्रकाश सुरवसे सर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी प्रकाश सुरवसे यांची निवड.
मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर
प्रकाश सुरवसे सर यांनी व्यक्त केले मनोगत.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०५/१०/२६)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) माझ्यावर जो विश्वास टाकून अक्कलकोट तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचा मनापासून आभारी आहे. सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने काम करू असे मनोगत
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) अक्कलकोट तालुक्याचे नुतन अध्यक्ष प्रकाश सुरवसे सर यांनी व्यक्त केले.
अक्कलकोट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी प्रकाश सुरवसे यांची निवड झाल्याबद्दल नुकतेच प्रकाश सुरवसे सर यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते प्रकाश सुरवसे सर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश सुरवसे सर बोलत होते.
पुढे बोलताना प्रकाश सुरवसे सर म्हणाले की आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारधारेवर आणि सर्वसमावेशक धोरणांवर माझा विश्वास आहे. आगामी काळात अक्कलकोट तालुक्यात पक्षाची संघटना गावागावात, बूथ पातळीपर्यंत मजबूत करणार आहे. सामान्य कार्यकर्ता, शेतकरी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडून पक्षाला नव्याने उभारी देण्याचे काम मी करणार असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी चेअरमन महेश इंगळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी प्रकाश सुरवसे सर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिक बिराजदार, वैरागचे राजाभाऊ इंगळे, श्रीशैल गवंडी, संतोष जाधव सर, खाजप्पा झंपले आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश सुरवसे सर यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!