गावगाथा

*भुरीकवठे येथे भारतरत्न डॉ. कलाम जयंतीनिमित्त वाचन स्पर्धा*

वाचन संस्कृती वाढावी या हेतूने इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

*भुरीकवठे येथे भारतरत्न डॉ. कलाम जयंतीनिमित्त वाचन स्पर्धा*
भुरीकवठे, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर (प्रतिनिधी) – येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या सभागृहात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण गुरुजी यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.
यावेळी वाचन संस्कृती वाढावी या हेतूने इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमास वाचनालयाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button