२५ वे कल्याण पर्व रौप्यमहोत्सवाच्या तयारीला वेग; स्वागत समितीचे अध्यक्ष डॉ. अमरनाथ सोलपुरे तर महाराष्ट्र समन्वयकपदी विजयकुमार हत्तुरे
बसवकल्याण, दि. ___ : २४, २५ व २६ ऑक्टोबर २०२६ रोजी बसवकल्याण (जि. बिदर, कर्नाटक) येथे आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या कल्याण पर्व रौप्यमहोत्सवाच्या तयारीला वेग आला असून महाराष्ट्र स्वागत समिती व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
-

श्री मनीरंजन महाजगद्गुरु गंगादेवी माताजी, अध्यक्ष, बसव धर्मपीठ (कुडलसंगम) तसेच परमपूज्य जगद्गुरु सिद्धरामेश्वर स्वामीजी, अध्यक्ष, अल्लम प्रभू शून्य पिठाधीश (बसवकल्याण) यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीची घोषणा करण्यात आली.
महोत्सवाच्या महाराष्ट्र स्वागत समितीच्या अध्यक्षपदी शरण डॉ. अमरनाथ सोलपुरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजनाची जबाबदारी पार पडणार आहे.
तसेच महाराष्ट्र समन्वयक म्हणून शरण विजयकुमार हत्तुरे (माजी परिवहन सभापती, सोलापूर महानगरपालिका) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सह-समन्वयक म्हणून शरण प्रा. भिमराव पाटील (सर), शरण प्रा. सुनील हेंगणे, शरण सतीश पाटील (अध्यक्ष, राष्ट्रीय बसव दल, पुणे), शरण मल्लिकार्जुन तगारे आणि शरण सुशीलकुमार जिवणे यांची निवड करून विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

बैठकीत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील बसवभक्त, शरण-शरणी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जनजागृती मोहीम, निवास व्यवस्था, महाप्रसाद दासोह, स्वयंसेवक नियोजन, वाहतूक व्यवस्था तसेच सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत सविस्तर चर्चा करून नियोजन करण्यात आले.

या रौप्यमहोत्सवात देशभरातील संत-महंत, मठाधीश, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि लाखो बसवभक्त सहभागी होणार असून महात्मा बसवेश्वरांच्या समता, कायक, दासोह आणि मानवतेच्या संदेशाचा व्यापक प्रसार केला जाणार आहे.
स्वागत समितीने सर्व बसवभक्त, शरण-शरणी आणि समाजबांधवांना या ऐतिहासिक रौप्यमहोत्सवी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!