शून्यातून विश्व निर्माण करणारा हाडाचा क्रिएटिव्ह गुणी कलाकार — मल्लू शिरगण
गावगाथा वाढदिवस विशेष

गावगाथा वाढदिवस विशेष

शून्यातून विश्व निर्माण करणारा हाडाचा क्रिएटिव्ह गुणी कलाकार — मल्लू शिरगण


मल्लू डिजिटल सध्या सोलापूर शहरातील नामांकित व प्रसिद्ध नांव सोलापूर जिल्ह्यातील दर्जेदार हटके डिझाईन करणारे एकमेव नाव म्हणजे मल्लू डिजिटल होय हे यश संपादन करण्यासाठी केलेलं अपार कष्ट जिद्द व चिकाटी मुळे आज सर्वत्र मल्लू डिजिटल नाव आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात सर्व सामान्य कुटुंबात मल्लू यांचा जन्म झाला. वडील एस.टी महामहामंडळात वाहक आई गृहिणी भाऊ बहिण अशा परिवार मल्लू याचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वागदरी येथे पूर्ण केले आहे.दहावी नंतर सोलापूर येथे कृषी महाविद्यालय मध्ये प्रवेश घेऊन शेती अभ्यास पूर्ण केले. पण मल्लू यांचे मन शेती मध्ये क्षेत्रात रमले नाही सोलापूर मध्ये याच दरम्यान डिटीपी चा कोर्स केला व सोलापूर येथील मयूर प्रिंटिंग प्रेस कामं लागले त्यांनतर डिझाईन क्षेत्रात झपाट्याने बदल होतं गेले यांचं क्षेत्रात आपणं कामं केलें पाहिजे म्हणून

नवनवीन कोर्स करत यूक्यू.डॉट्स व महेश प्रिंटिंग डिझाईन मध्ये जवळपास पाच सहा वर्ष कामं केलं. आपणं स्वतःचं व्यवसाय करावे म्हणून पूर्वी केलेल्या कामाच्या जोरावर अनुभव पाठीशी घेऊन २०१० मध्ये महत्त्वाचे पाऊल टाकत स्वतः चे स्वतंत्र ‘मल्लू डिजिटल’ नावाने सात रस्ता सोलापूर मध्ये काम चालू केले. हळूहळू या क्षेत्रात जम्म बसवले कुणाच्या हि सहकार्य शिवाय फक्त जिद्द चिकाटी व कष्टाने आपलं व्यवसाय सातत्याने सुरू ठेवले.
यांचं यशाचं रहस्य गमक सांगायचे म्हणजे मल्लू यांचं अतिशय प्रेमळ हसमुख मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांच्या कडे एकदा आलेला माणूस त्यांचा प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही अशा व्यक्तीमत्व आहे.डिझाईन मध्ये इतरांपेक्षा हटके व कल्पकता वैशिष्ट्यपूर्ण दर्जेदार मांडणी यामुळे त्यांच्या कडे लोक आवर्जून डिझाईन करण्यासाठी येतात. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे त्याचं बोलणं अतिशय गोड आणि नम्र आहे
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांवर अफार श्रद्धा आहे जे काही आहे स्वामी कृपेने असे आवर्जून सांगतात….कुठलाही गर्व नाही मल्लू यांच्यांत नम्रता ठासून भरलेला आहे यामुळे या क्षेत्रात इतके वर्ष टिकून आहेत.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जंयती,जत्रा,उरूस ,धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वाढदिवस, लग्न समारंभ व राजकीय शुभेच्छा जाहिरात करण्यासाठी रोज अनेक लोक त्यांच्या कडे येतात प्रत्येकाला वेळ त्याना आवडेल अशा कलाकृती डिझाईन करणे ग्राहकांचे समाधान हेच माझं काम असे नेहमी मल्लू यांच्या तोंडांत असते
मल्लू नेहमी राजकारण आणि राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. जिल्ह्यातील सर्व पक्षीय सामान्य कार्यकर्ता ते मोठे नेते लोकप्रतिनिधी बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत.राजकीय मंडळींचा वाढदिवस शुभेच्छाचे हटके वैशिष्ट्यपूर्ण केलेले डिझाईन जाहिरात जिल्ह्यातील नामवंत दैनिकात पहिला पानावर छापून येतात इतके त्याचं अप्रतिम असते.
मैत्रीला जागणारा दिलदार व्यक्तीमत्व म्हणून मल्लू हे परिचित आहेत.माणूस म्हणून ग्रेट आहेत.प्रसिद्धी झोतात न राहता सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकांना मदत सहकार्य करत असतात.
आज मल्लू याचा वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा…..

धोंडपा नंदे,वागदरी