गावगाथा

धरित्री विद्यालय परिसरातील वीरभद्र मंदिराजवळ स्नेहभोजन संपन्न

स्नेहभोजन

धरित्री विद्यालय परिसरातील वीरभद्र मंदिराजवळ स्नेहभोजन संपन्न

HTML img Tag Simply Easy Learning    

नळदुर्ग-ज्ञानदीप कलोपासक मंडळ नळदुर्ग संचलित धरित्री विद्यालय आलियाबाद येथील विद्यार्थ्यांचा शिक्षण सप्ताहाच्या निमित्त स्नेहभोजनाचा उपक्रम घेण्यात आला. निसर्गाच्या कुशीत नटलेल्या धरित्री विद्यालयाजवळच असलेल्या वीरभद्र मंदिराजवळ या विद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यात आले यावेळी पहिली ते दहावीतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सकाळी आठ वाजता सर्व विद्यार्थी एकत्र झाले. परिपाठानंतर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी चौथी मधील मराठी व इंग्रजी विषयाच्या कविता सादर केल्या.यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रार्थना सादर केल्या. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी गोष्टी सांगितल्या. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या दोन नाटिका सादर केल्या. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या विषयावर मनोगत व्यक्त केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित अंताक्षरी घेण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी वीरभद्र मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button