अक्कलकोट संस्थान चा इतिहास प्रेरणादायी ..डॉ मंजिरी कुलकर्णी
कर्मवीर मामासाहेब जगदाळे जयंती निमित्त व्याख्यान कार्यक्रम
अक्कलकोट छत्रपती शाहू महाराजांच्या काळात अतुलनीय कामगिरी करून मराठ्यांच्या कार्यास लौकिक प्राप्त करून देणाऱ्या अक्कलकोट संस्थान चा इतिहास प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन कन्या महाविद्यालय मिरज येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ मंजिरी कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील इतिहास विभागाने कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट संस्थान चा इतिहास या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर समन्वयक मलकप्पा भरमशेट्टी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ कुलकर्णी म्हणाल्या की, छत्रपती शाहू महाराजांची औरंगजेबाच्या कैदेतून मुक्तता झाली. त्यानंतर स्वराज्यात आगमन होताच त्यांनी पारद येथील पहिली लढाई जिंकली या लढाईत सयाजी लोखंडे पाटील शहीद झाले. पहिल्याच लढाई फत्ते झाल्यामुळे सयाजी यांची पुत्र राणोजी त्याचे नामकरण फत्तेसिंह करून त्यास भोसले आडनाव जोडून अक्कलकोटची जहागिरी देण्यात आली. त्यावेळी 108 गावाची जहागिरी देण्यात आली. त्यावेळी अक्कलकोट परगणा होता. त्याचे उत्पन्न 55 लाख इतके होते. त्यांनी शाहू महाराजाकडून अनेक मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला.
पुढे अक्कलकोट संस्थानामध्ये फत्तेसिंह राजे भोसले यांची राणी ताराबाई यांनी संस्थान नावारूपास आणले. ते पहिल्या महायुद्धात सहभागी झाले.
तर विजयसिंह राजे भोसले यांनी दुसऱ्या महायुद्धात देशाकडून अतुलनीय कामगिरी बजावली. त्यावेळी त्यांनी वापरलेली शस्त्रे आजही अक्कलकोटच्या संग्रहालयात उपलब्ध आहेत. त्यांच्या कारकीर्दीत स्वातंत्र्य चळवळ प्रजा परिषदेने सुरू केली. पुढे विलीनीकरणाच्या कायद्यानुसार अक्कलकोट संस्थान विलीन झाले.
मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, अक्कलकोट संस्थांनचा इतिहास खूप दुर्लक्षित होता त्यावर संशोधन करून डॉ मंजिरी कुलकर्णी यांनी संस्थानावर ग्रंथ लिहिला आहे. त्यामुळे आता संस्थांनची कामगिरी समाजाला समजेल.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन प्राध्यापिका डॉ शितल झिंगाडे भस्मे यांनी केले तर आभार प्राध्यापिका मधुबाला लोणारी यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी केले समाज परिवर्तन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी वंचित अपेक्षित व बहुजन समाजात मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणली त्यामुळे समाज परिवर्तनास गती मिळाली असे मत मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले मान्यवरांनी कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांना अभिवादन केले
अक्कलकोट संस्थांनचा इतिहास ग्रंथाचे स्वागत होईल
डॉ मंजिरी कुलकर्णी यांनी प्रकाशित केलेली अक्कलकोट संस्थानचा इतिहास ग्रंथाचे अक्कलकोट कर मंडळी स्वागत करतील भविष्यात तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असे कौतुकास्पद प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी सर यांनी केले
फोटो ओळ कल्याणशेट्टी महाविद्यालयात कर्मवीर मामासाहेब जगदाळे जयंती निमित्त व्याख्यान प्रसंगी ग्रंथ भेट देताना डॉ मंजिरी कुलकर्णी व मान्यवर