पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी समाजासाठी दिलेले योगदान वंदनीय — मुकुंद पत्की
पंचप्पा कल्याणशेट्टी पुण्यतिथी निमित्त शिक्षण संकुलात विविध कार्यक्रम
अक्कलकोट: पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोचविली. त्यासाठी महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक परिवर्तन व्हावे म्हणून वंचित, उपेक्षित व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून हन्नूर व अक्कलकोट या ठिकाणी शिक्षणाची सोय केली. शेतकऱ्यांसाठी पाणलोट क्षेत्र विकासाचे कार्य केले. शेतकरी शेतमजूर यांना माफक दरात कर्ज मिळावे म्हणून शासन दरबारी प्रयत्न करून त्यांच्या विकासात योगदान दिले. म्हणूनच त्यांचे कार्य वंदनीय आहे असे प्रतिपादन संस्थेचे संचालक मुकुंद पत्की यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक कै.पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर मल्लिनाथ कल्याणशेट्टी, भीमराव साठे, राचप्पा वागदरे, संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, विज्ञान विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर एक पेड मा के नाम, स्वच्छता अभियान स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत रूगे यांनी केले, सूत्रसंचालन कल्पना स्वामी यांनी केले तर आभार निशिगंधा कोळी यांनी मानले. या कार्यक्रमास बापूजी निंबाळकर, खिरप्पा गवंडी, शिवानंद पुजारी, खंडेराव घाटगे,अ करीम मुल्ला, सेमी विभागाचे दिगंबर जगताप आदी उपस्थित होते.
चौकटीतील मजकूर
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम.
दरम्यान पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या पुण्यतिथी निमित्त वरिष्ठ महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, समन्वयक मलकप्पा भरमशेट्टी यांची प्रमुख उपस्थित होती.
फोटो ओळ
पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करताना मुकुंद पत्की, मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर
Back to top button
×
No WhatsApp Number Found!