श्रावणमासा निमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
(श्रीशैल गवंडी, दि.२३/०७/२०२५.अ.कोट)
यंदाच्या श्रावणमासा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
श्रावणमासातील शुक्रवार दिनांक – २५ जुलै ते गुरुवार दिनांक – ३१ जुलै अखेरच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प.श्रीहरी महाराज रसाळ (अंबड) जि.जालना यांच्या वाणीतून भागवत कथा सप्ताहाचे, शुक्रवार दिनांक – १ ऑगस्ट ते शुक्रवार दिनांक – ८ ऑगस्ट अखेरच्या दुसऱ्या सप्ताहात ह.भ.प.श्री. मनोहर महाराज घोरपडे (महालिंगरायवाडी, उस्मानाबाद) यांचे गीता पठण सप्ताहाचे,
रविवार दिनांक – १० ऑगस्ट ते शनिवार दि.१६ ऑगस्ट अखेरच्या तिसऱ्या सप्ताहात ह.भ.प. योगीराज महाराज प्रकाश गोंदीकर (श्री क्षेत्र गोंदी) जि.जालना यांचा गोकुळ अष्टमी व गोपाळकाल्या निमित्त कीर्तन सेवेचे, रविवार दि.१७ ऑगस्ट ते शनिवार दि.२३ ऑगस्ट अखेरच्या श्रावण मासातील शेवटच्या सप्ताहात वसई येथील ह.भ.प. श्री.प्रदीप पाठक यांच्या नारदीय किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
वरील सर्व कार्यक्रम नियोजीत तारखेस व वेळेवर देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत संपन्न होणार आहेत. श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
(चौकट – श्रावण मासातील प्रत्येक श्रावण सोमवारी नित्यनियमाने होणारी श्री स्वामी समर्थांची नैवेद्य आरती सकाळी ११:३० वाजता न होता सायंकाळी ५:३० वाजता होईल, व आरतीनंतर देवस्थानकडुन प्रसाद वाटप करण्यात येईल, तदनंतर त्यादिवशी रात्रीची शेजारती होणार नाही याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी.)
Back to top button
×
No WhatsApp Number Found!