गावगाथा

सेंट टेरेसा शाळेत नवनियुक्त कॅप्टन सेरेमनी संपन्न…

शैक्षणिक बातमी

सेंट टेरेसा शाळेत नवनियुक्त कॅप्टन सेरेमनी संपन्न…

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

गणेश हिरवे…मुंबई प्रतिनिधी…वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल येथे नुकताच शाळेची कौन्सिल टीम निवड म्हणजेच नवनियुक्त कॅप्टन निवडणे कार्यक्रम शाळेचे मुख्याद्यापक फादर निकी, उपमुख्यध्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.शाळेत रेड, ग्रीन, यलो आणि ब्लू असे चार हाऊस आहेत.दरवर्षी शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एका कॅप्टन, दोन उपकॅप्टन, स्पोर्ट्स, सायन्स, आर एस पी, स्काऊट अशी विविध कॅप्टन निवडण्याचा कार्यक्रम होत असतो.हे सर्व कॅप्टन लोक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शाळेत अनेक चांगली काम करीत असतात.स्पोर्ट्स डे दिवशी विविध हाऊस मधील विद्यार्थी आपापल्या हाऊस साठी चिअर्स अप करीत असतात.एकप्रकारे हे स्वतः शिस्तीत वागून विद्यार्थ्याना शिस्त शिकविणे यासाठी पुढाकार घेतात.यावेळी विविध कॅप्टन म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि शाळेतील इतर विद्यार्थी या नवनियुक्त टीम ला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.आपला मुलगा कॅप्टन झाल्याचे समाधान अनेक पालकांच्या चेहऱ्यावर दिसून आले..शाळेतील इयत्ता आठवी कमिटीने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button