गावगाथा

अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस ( श. प.) पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी प्रा. प्रकाश सुरवसे, तर शहरअध्यक्ष पदी गंगाधर मोरे.

निवड नियुक्ती

अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस ( श. प.) पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी प्रा. प्रकाश सुरवसे, तर शहरअध्यक्ष पदी गंगाधर मोरे.
अक्कलकोट (प्रतिनिधी) अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस ( श. प.) पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी प्रा. प्रकाश विलासराव सुरवसे आणि शहरअध्यक्ष पदी गंगाधर मोरे यांची निवड करण्यात आली. सोलापूर येथील हॉटेल सी. टी. पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदवीधर निवडणूक निरीक्षक मकरंद कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, महेश गादेकर, प्रा. लक्ष्मण ढोबळे, जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, बोरगाव दे. येथील ज्ञानेश्वर पाटील, राजाभाऊ पाटील, संभाजी पाटील, लक्ष्मण कल्याणी, माणिक बिराजदार, गुरुशांत स्वामी, मुस्ताक शेख, संतोष सुरवसे, अलिशा मकानदार, शरणाप्पा मणुरे, नेताजी पाटील, योगेश पाटील, सतीश पवार, जिलानी वळसंगकर, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. प्रकाश सुरवसे यांनी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार पोहचवून शेतकरी, शेतमजूर,विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, यांना विश्वासात घेऊन पक्षविस्तार करणार असल्याचे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button