गावगाथा

वागदरी शाळेच्या रंगकामासाठी किर्लोस्कर कंपनीचे योगदान; मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार

सामाजिक बांधिलकी

वागदरी शाळेच्या रंगकामासाठी किर्लोस्कर कंपनीचे योगदान; मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

वागदरी : आपल्या वागदरी गावचे सुपुत्र तथा किर्लोस्कर कंपनीचे प्रमुख श्री. संतोष गुमास्ते यांच्या पुढाकारातून किर्लोस्कर कंपनीच्या माध्यमातून वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेचे संपूर्ण रंगकाम करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमामुळे शाळेच्या इमारतीला नवे रूप प्राप्त झाले असून, शाळेचा परिसर अधिक आकर्षक व प्रसन्न झाला आहे.
शाळेच्या विकासासाठी सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत किर्लोस्कर कंपनीने केलेल्या या सहकार्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या वतीने कंपनीच्या मान्यवरांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.
यावेळी किर्लोस्कर कंपनीचे व्यवस्थापक श्री. ऋषिकेश कुलकर्णी, श्री. अनंत जाधव, श्री. गुलाब राजपूत, श्री. देशपांडे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेच्या रंगकामासाठी कंपनीने दिलेल्या सहकार्याबद्दल उपस्थितांनी आभार व्यक्त केले.


या कार्यक्रमास मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुसया कलशेट्टी, मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब बनसोडे, श्री. शिवानंद पाटील सर, गौडगाव प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले वागदरी गावचे सुपुत्र श्री. शिवपुत्र चोल्ले सर, गोगावचे उपसरपंच श्री. कमलाकर सोनकांबळे, श्री. महादेव सोनकवडे, तसेच मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारुती शिंदे यांच्यासह शिक्षक, मान्यवर व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
शाळा ही गावाच्या शैक्षणिक विकासाचे केंद्र असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना चांगले आणि प्रेरणादायी वातावरण मिळते. वागदरी गावचे सुपुत्र श्री. संतोष गुमास्ते यांच्या पुढाकारातून किर्लोस्कर कंपनीने केलेले हे सहकार्य निश्चितच कौतुकास्पद असून, इतर संस्था व व्यक्तींनाही आपल्या गावातील शाळांच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा देणारे आहे.
शाळेच्या रंगकामामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांनी किर्लोस्कर कंपनी आणि श्री. संतोष गुमास्ते यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक व आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button