सी. बी. खेडगी महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा
अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची प्रमुख उपस्थिती

📰 सी. बी. खेडगी महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा 📰
अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची प्रमुख उपस्थिती

अक्कलकोट | प्रतिनिधी :
सी. बी. खेडगी महाविद्यालयामध्ये संस्थेचे चेअरमन सन्माननीय श्री बसलिंगप्पा खेडगी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार अर्थशास्त्र विभागाच्या वतीने “११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन” उत्साहात व शिस्तबद्धपणे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय श्री रमाकांत डाके साहेब तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले सर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात “लोकसंख्या वाढ व विकास” जनजागृती प्रबोधन फलक उद्घाटनाने झाली. याचे उद्घाटन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी केले. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात जागतिक व भारतीय लोकसंख्येची सद्यस्थिती, त्यातील बदल, व भविष्यातील दृष्टीकोन यावर विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, भारतातील लोकसंख्या वाढ ही चिंतेची बाब नसून, ती योग्य दिशेने वळविली तर ती देशाच्या प्रगतीचे साधन ठरू शकते. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कौशल्य व तंत्रज्ञान शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.

प्रमुख पाहुणे रमाकांत डाके यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, ग्रामीण व शहरी भागात विद्यार्थ्यांनी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांतून जनजागृती घडवून लोकसंख्या नियोजनात भाग घ्यावा. यामुळेच या दिनाचे खरे स्वरूप साध्य होईल.

प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारताच्या लोकसंख्या वाढीचे परिणाम आणि त्यातील आव्हाने विषद करत सामूहिक प्रयत्नांतून लोकसंख्या नियंत्रणास प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. संध्या इंगळे (अर्थशास्त्र विभाग) यांनी उत्कृष्टरित्या केले.
या वेळी हिंदी विभाग प्रमुख प्रा. विठ्ठल वाघमारे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. किशोर थोरे, मराठी विभाग प्रमुख डॉ. सी. डी. आणेकर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. आबाराव सुरवसे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आप्पासाहेब देशमुख, प्रा. विकास भारतीय, प्रा. रमेश धोत्रे, प्रा. नागेश कांबळे, प्रा. सिद्धाराम पाटील, श्री अशोक इसापुरे, सेवक प्रशांत कडबगावकर, विजय माळाबागी, गुरु चौधरी, हणमंत कोतले, शिवू भासगी, रमेश पुजारी, बालाजी घंटे आदी मान्यवर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. संजय कलशेट्टी, सुहास जवळगे, अभिषेक प्रचंडे, सैफुल जमगे, कु. लक्ष्मी जाधव, कु. वैष्णवी चव्हाण, कु. अक्षता म्हेत्रे, कु. प्रज्ञा प्रताप, कु. बालिका सलगरे, कु. स्वाती पवार, कु. स्वाती वाकडे व इतर विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाची सांगता “लोकसंख्या विकास व प्रबोधन प्रतिज्ञा” घेत विद्यार्थी-शिक्षकांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्धार केला.
आभार प्रदर्शन प्रा. संध्या इंगळे यांनी केले.