हैदराबाद येथील लिंगायत महामोर्चात लाखो समाजबांधव मागण्यासाठी रस्त्यावर
भारत देशा जय बसवेशा या घोषणाने शहर दुमदुमले

हैदराबाद येथील लिंगायत महामोर्चात लाखो समाजबांधव मागण्यासाठी रस्त्यावर
भारत देशा जय बसवेशा या घोषणाने शहर दुमदुमले

हैद्राबाद शहर ( ) दि. ४ जून २०२३ रोजी
लिंगायत धर्माला स्वतंत्र संवैधानिक मान्यता, अल्पसंख्यक दर्जा, विविध राज्यात ओबीसी आरक्षण या प्रमुख मागण्यासाठी लिंगायत महामोर्चा आयोजित केली होती. तेलंगणा राज्यातील पहिली महारैली अभूतपूर्व यशस्वी झाली. बीदर पासून मुंबई महामोर्चा पर्यंत २३ महामोर्चा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या. २४वी हैद्राबाद महामोर्चा तेलंगाना राज्यात असल्यामुळे कन्नड,मराठी आणि तेलगू माध्यमाचा सर्रास वापर झाला.

महामोर्चाची सुरवात जगद्गुरु चन्नबसवण्णा स्वामीजी बंगळुरू यांचे हस्ते प्रथम महात्मा बसवण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली.नंतर धर्म ध्वजारोहण करण्यात आले. बसव धर्मपिठाच्या द्वितीय महिला जगद्गुरु गंगामाताजी यांनी दीपप्रज्वलन केले.याप्रसंगी जगद्गुरु बसवलिंग पटदेवरू भालकी, जगद्गुरु हुलसुर आप्पाजी, माता गंगाबिका, परमपूज्य बसव प्रभू महास्वामी, जगद्गुरु सिद्धरामेश्वर महास्वामीजी बसवकल्याण आदी सह कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध मठाधीश तसेच हैदराबाद महामोर्चा चे संयोजक शंकर पटेल, विजयकुमार पटणे, लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर, समन्वयक विजयकुमार हत्तुरे, राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष बसवराज धनुर, श्रीकांत स्वामी, लिंगायत धर्म महासभेचे बी एस पाटील, सांगलीचे प्रदीप वाले, लातूरचे सुनील हेंगणे, वर्ध्याचे कैलास वाघमारे,जतचे तुकाराम माळी, बसव ब्रिगेडचे सिद्धेश्वर औरादे,बसवेश्वर हेंगणे, चन्नम्मा ब्रिगेडचे अध्यक्ष शितल महाजन,नांदेडचे पिंटू बोंबले,कुराडे,सोलापूरचे राधाकृष्ण पाटील, नागेश पडनुरे,आदी उपस्थित होते
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे विश्वगुरू बसवण्णां यांचे अनुयायी असून ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अधिकार पदी आल्याबरोबर त्यांनी कर्नाटक राज्यातील सरकारी कार्यालयात विश्वगुरू बसवण्णा यांचे फोटो लावण्याचे आदेश काढून अमलबजावणी केली. आणि लिंगायत धर्माला केंद्र सरकारकडून स्वतंत्र संवैधानिक मान्यता मिळण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. त्या आयोगाने सखोल संदर्भांचा अभ्यास करून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची शिफारस कर्नाटक राज्य सरकारला केली. कर्नाटक राज्य सरकारने ती शिफारस राज्याचे मंत्री मंडळ बैठकीत मंजूर करुन केंद सरकारला लिंगायत धर्माला त्वरीत स्वतंत्र संवैधानिक मान्यता द्यावी म्हणून शिफारस केली. त्याचप्रमाणे तेलंगणा सरकारचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्य मंत्रिमंडळात सर्व मागण्या मान्य करून तात्काळ केंद्राकडे शिफारस करावे अशी मागणी जगद्गुरु चेन्नबसवानंद महास्वामीजी यांनी केले आहे.

या महामोर्चास केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, खासदार जनार्दन रेड्डी, आमदार ती राजा सिंग, तेलंगणा कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी माणिकराव ठाकरे आधी सह आजी-माजी खासदार यांनी भेट दिली. मोर्चा यशस्वी करण्यासाठी तेलंगणा लिंगायत समन्वय समितीचे श्री मधु विजयकुमार पटणे भीमराव बिराजदार बिरादार आदी सह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेतले.
