वटवृक्षाखालील मंगलस्वर पहाटगाण्यांनी (भाविक) रसिक श्रोते मंत्रमुग्ध
वटवृक्ष मंदिरात गायनसेवा सादरीकरण प्रसंगी मनोहर देगांवकर व सहकारी दिसत आहेत.

वटवृक्षाखालील मंगलस्वर पहाटगाण्यांनी (भाविक) रसिक श्रोते मंत्रमुग्ध
(श्रीशैल गवंडी- दि.३/११/२४) –
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मनोहर देगांवकर व सहकाऱ्यांच्या सुमधूर मंगल स्वरात आयोजित करण्यात आलेल्या पहाटगाणी व अभंगसंध्या या कार्यक्रमात उपस्थित (भाविक) रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. यानिमित्ताने त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे
यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक श्रीशैल गवंडी यांनी सर्व कलाकारांचे स्वागत व आदरतिथ्य केले. देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत लक्ष्मीपुजन, पाडवा, भाऊबीज या दिपावलीच्या तीन दिवसीय मांगल्य मुहूर्तावर देगावकर व सहकाऱ्यांनी पहाटेच्या सत्रात शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत तसेच गायनातील विविध रागांवर पहाटगाणी व सायंकाळच्या सत्रात अभंगवाणी गाऊन उपस्थित भाविकांना दिवाळीची भक्तीमय भेट दिली.याप्रसंगी देगावकर व सहकाऱ्यांनी या गायन सेवेच्या माध्यमातून अतिशय भावपूर्ण स्वरमय अशी स्वरांजली सद्गुरू स्वामी समर्थांच्या चरणी सादर करताना भाव तन्मयता आणि नवविधा भक्तीच्या माध्यमातून सद्गुरु स्वामी समर्थ आपल्या सदभक्तांचे रक्षण कशाप्रकारे करतात या प्रचितीचे विशेष जाणीव भाविकांना करून दिली. अनन्याश्चिंतयंतो मां ये जना: पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं’ या भगवद्गीतेतील भगवान गोपाल कृष्णाच्या श्लोकास स्मरून जीवन जगल्यास आपल्या अंतरात्म्यातील दीपोत्सव जागृत होऊन अखंड जीवनास दीपोत्सव म्हणजेच दिवाळीची झळाळी येईल असे स्पष्टीकरण देऊन दीपावलीच्या या हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या दीपोत्सवात स्वामींच्या चरणी पहाट गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करून स्वामी कृपेने व मंदिर समितीच्या सहकार्याने दरवर्षी यशस्वीपणे स्वामी चरणी सेवा रुजू होत असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, व्यंकटेश पुजारी, मंदार महाराज पुजारी, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, विजयकुमार कडगंची, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, ऋषिकेश लोणारी, अविनाश क्षीरसागर, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, काशिनाथ इंडे, संजय पवार, विपूल जाधव आदींसह अनेक भाविकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला.


फोटो ओळ – वटवृक्ष मंदिरात गायनसेवा सादरीकरण प्रसंगी मनोहर देगांवकर व सहकारी दिसत आहेत.
