गावगाथा
वात्सल्य ट्रस्ट सानपाडा येथील गरजू विद्यार्थिनीं ना दिवाळी निमित्त मिळाला जॉय
सामाजिक बांधिलकी

वात्सल्य ट्रस्ट सानपाडा येथील गरजू विद्यार्थिनीं ना दिवाळी निमित्त मिळाला जॉय
सुभाष मुळे
मुंबई प्रतिनिधी..

दीपावली सणाच्या निमित्ताने मुंबई महाराष्ट्रातील अग्रगण्य जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने दिनांक २ नोव्हेंबर रोजी सानपाडा स्थित बालिकाआश्रमातील जवळपास ५२ विद्यार्थ्याना किराणा किट, दिवाळी फराळ, पेन, मिठाई ,पुस्तकं देऊन सहकार्य करण्यात आले.जॉय संस्थापक गणेश हिरवे यांच्या अनुपस्थितीत समन्वयक वैभव पाटील यांनी या कार्यक्रमाची आखणी केली होती.पाटील यांनी प्रास्ताविक करून जॉय संस्थेची माहिती उपस्थितांना दिली.यावेळी सुभाष हांडे देशमुख, डॉ सुभाष घोपल आणि प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.जॉय ग्रुप अत्यंत चांगल्या उद्देशाने राज्यातील विविध भागात जात असून समाजातील दुर्बल, गोर गरीब, वंचित घटकांसाठी पुढाकार घेत असून वर्षभर त्यांचे हे काम सुरूच असते.
