गावगाथा

कचऱ्याची विल्हेवाट रोज लावावी

समस्या

कचऱ्याची विल्हेवाट रोज लावावी..

जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्टेशन लगतचा कचरा नियमित पणे उचलला जात नाही.यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कचरा गोळा होत असून आजूबाजूच्या रस्त्यावर येत असल्यामुळे पादचाऱ्यांना कचऱ्यातून वहिवाट करावी लागत आहे.खरतर हा सर्व परिसर वरचेवर स्वच्छ असायला हवा कारण येथे बाजूलाच अस्मिता शाळा आणि इतर अनेक शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याना सोडायला त्यांचे पालक येत असतात.यामुळे लहान मुलांना आजाराचा धोका अधिक मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.बाजूलाच असणाऱ्या वीर सावरकर5 उद्यानात सकाळी आणि संध्याकाळी अनेकजण व्यायाम व चालण्यासाठी येतात. यात ज्येष्ठांचे प्रमाण मोठे आहे.त्यांना देखील येथील दुर्गंधीचा रोजच सामना करावा लागतो आहे.कचऱ्या सोबत येथे घरातील जुनी अडगळ आणि वळवी लागलेले लाकडी फर्निचर देखील आणून टाकीत आहेत.येथील कचरा दिवसागणिक उचलला जावा किंवा येथील कचराकुंडी दुसरीकडे स्थलांतरित करावी अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button