गावगाथा

वधू-वर मेळावे समाजासाठी काळाची गरज – खासदार भाऊसाहेब वाकचौरे

पुण्यात चर्मकार समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर मेळावा उत्साहात संपन्न.

वधू-वर मेळावे समाजासाठी काळाची गरज – खासदार भाऊसाहेब वाकचौरे

पुण्यात चर्मकार समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर मेळावा उत्साहात संपन्न.

पुणे – चर्मकार समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर मेळावा काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे संपन्न झाला. सदर मेळाव्याची सुरवात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिप प्रज्वलन संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. रामदास आबणे व अखिल भारतीय रविदासीय धर्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव महाराज वाघमारे व इतर सामाजिक संस्थाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाली. सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य महसुली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, लक्ष्मीकांत पाचारणे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदाम लोखंडे, पुणे मनपा चे माजी अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, संत देवजीबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जर्नादन कुराडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब आबनावे, महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे, पुणे कॅन्टोंमेंट सह. बँकेचे संचालक अनिल आबनावे, सुवर्णयुग सह. बँकेचे संचालक सुनिल माने, दि पुना नागरी सह. पतसंस्थेचे उपाध्यक्ष कुमार काळे, पुणे शहर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संतोष टोणपे रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजुभाऊ बनसोड इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सांगता शिडींचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांनी समाजामध्ये विभक्त कुटूंब पध्दती आल्यामुळे वधु-वर मेळावे घेणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. त्याचप्रमाणे सामुदायीक विवाह सोहळे आयोजित करणे गरजेचे झाले आहे. श्री संत शिरोमणी रविदास समाज विकास संस्था यांच्या मार्फत राज्य स्तरीय वधु-वर मेळावा निःशुल्क घेताला जातो हा एक स्तुत्य समाजिक उपक्रम आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव सुर्यवंशी कार्याध्यक्ष अशोक कांबळे, उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सचिव भालचंद्र गोरेगावकर खजिनदार वसंतराव कांबळे, सहसचिव भगवान मस्तुद, कायदेशिर सल्लागार अॅड. दशरथ बनसोडे व इतर सहकारी यांच्या वतीने दर महिण्याला विविध जिल्हा व तालुका पातळीवर वर्षभर मेळावे आयोजित केले जातात. सदर प्रसंगी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब आबनावे यांनी सामुदायीक विवाह सोहळ्याची खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांच्या विनंतीस मान देऊन मंगल कार्यालय व इतर सुविधा पुरविण्याचे जाहिर केले. मेळाव्यामध्ये १६२ वधु-वरांनी नोंदणी केली. या व्यतिरीक्त अनेक पालकांनी मुलामुलींची नावे नोंद केली.
भालचंद्र गोरेगावकर यांनी संस्थेच्या विविध सामाजिक कार्याची माहीती दिली. संस्थापक अध्यक्ष सुखदेव सुर्यवंशी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button