गावगाथा

*गोगांव येथे ७९ वा स्वातंत्र्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा*

सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते ग्रामपंचायत व उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते जि.प. शाळेत ध्वजारोहण

*गोगांव येथे ७९ वा स्वातंत्र्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा*
(सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते ग्रामपंचायत व उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते जि.प. शाळेत ध्वजारोहण.)
अक्कलकोट प्रतिनिधी
ग्रामपंचायत गोगांव येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी गोगांव गावचे सरपंच सौ.वनिता मधुकर सुरवसे यांच्या हस्ते ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी ग्रा.सदस्य सदस्य प्रदीप जगताप होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन शेतकरी दयानंद जिरगे व नबीलाल नदाफ यांच्या हस्ते करण्यात आले.
. जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे उपसरपंच श्री कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याठिकाणी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अधिकारी विक्रम घाटे हे होते.प्रतिमा पूजन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर जगताप व कुमार सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आरोग्य उपकेंद्र गोगांव वतीने तंबाकू विरोधी शपथ घेण्यात आले. शालेय मुला मुलींना पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गोगांव, सरपंच वनिता सुरवसे, सिद्धार्थ सोशल फौंडेशन वतीने खाऊ व फळे वाटप करण्यात आले.
. यावेळी सरपंच वनिता सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, सदस्य प्रदीप जगताप,लक्ष्मण बिराजदार,ललिता कलशेट्टी,पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड, डॉ. लिंगराज नडगेरी, कल्याणराव बिराजदार, निवृत्ती सुरवसे, सुरेश सोनकांबळे, शरणपा कलशेट्टी, मुख्याध्यापक पुंडलिक वाघमारे, शंकर कारभारी, भोसले मॅडम, डॉ लिंगराज नडगेरी,आरोग्य सेविका आंबिका वळसंग, मधुमती गायकवाड, आरोग्य सेवक राकेश चव्हाण, परमेश्वर गायकवाड, शरण कुरणे, सूर्यकांत जिरगे, आकाश गायकवाड, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button