गावगाथाठळक बातम्या
Central staff : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्यांनी वाढ ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, फक्त यांनाच मिळणार लाभ
मुंबई (प्रतिनिधी): केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रिय कर्मचारी आणि स्वायत्त संस्था (सार्वजनिक उपक्रम विभाग)च्या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता लागू होणार आहे.

ज्यांना ५ व्या आणि ६ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो. त्यांच्याच महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक उपक्रम विभागाने निवेदन जारी केले आहे.

सहाव्या वेतन आयोगानुसार, पगारदार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सध्याच्या २३९ टक्क्यांवरुन २४६ टक्के करण्यात आली आहे. ही वाढ १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात ७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
