गावगाथा

दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण..

शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विम्याचे होणार प्रदान

दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण..

*रायगडावरील गाईडना आरोग्य विमा संरक्षण*

*- वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाचा पुढाकार*

*करमाळा जि. सोलापूर येथील मुक्ताई गारमेंटच्या सौजन्याने अभिनव उपक्रम*

*- शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विम्याचे होणार प्रदान*

*रायगडावर ५ ठिकाणी , मुक्ताई गारमेंटतर्फे चिवटे बंधू यांजकडून सुरू आहे गेली २ वर्षांपासून अखंड पुष्पहार सेवा*

*मुंबई :रायगडचा इतिहास अनेक वर्ष हुबेहूब मांडणारे तब्बल २२ गाईडना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्षाच्या वतीने रायगडच्या गाईड लोकांना आरोग्य मदतीचा हात दिला आहे.
किल्ले रायगडावरील एकूण २२ गाईड येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगत असतात. अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत सर्व गाईड मंडळी रायगडवर निस्सीम प्रेम करत पराक्रमी इतिहास रोज सांगत असतात. शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने दरवर्षी ड्रेस कोड प्रदान केला जातो तसेच, मूर्ती पूजनाचे साहित्य दिले आहे.

*तसेच गेली २ वर्षांपासून खासदार डॉक्टर श्रीकांत दादा शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून मुक्ताई गारमेंटतर्फे रायगडावर पाच ठिकाणी अखंड पुष्पहार सेवा हा अभिनव उपक्रम सुरू आहे. १९ फेब्रुवारी २०२१ पासून रायगडावरील १.राजसदर येथील श्री शिवछत्रपतींचा पूर्णाकृती मूर्ती २.होळीचा माळ येथील पूर्णाकृती मूर्ती ३.शिरकाई देवीचे मंदिर ४. श्री जगदीश्वर मंदिर आणि ५.शिवसमाधी या सर्व ठिकाणी दररोज पुष्पहार अर्पण केले जातात.* त्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे गाईड लोकांना आरोग्य विमा संरक्षण. यामध्ये रायगड गाईड संघटनेचे पप्पू औकिरकर (अध्यक्ष), रामचंद्र अवकीरकर, संदीप ढवळे, सखाराम अवकीरकर, संदीप शिंदे, सुनील शिंदे, दिलीप अवकीरकर, निलेश ऑकिरकर, गणेश झोरे, सुनील अवकीरकर, मनेश गोरे, सिताराम अवकीरकर, सुरेश आखाडे, अंकेश अवकीरकर, बाळाराम महाबळे, प्रदीप अवकीरकर, सिताराम झोरे, लक्ष्मण अवकीरकर, आकाश हिरवे, रमेश अवकीरकर, सागर काणेकर, चंद्रकांत अवकीरकर अशा एकूण 22 गाईड लोकांचा समावेश आहे. वार्षिक पाच लाख रुपये कव्हर असून यामध्ये सर्व आजार समावेश आहे. यामध्ये गाईडच्या कुटुंबालाही आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे. 2 जून रोजी 350 व्या शिवराज्याभिषेक मुख्य सोहळ्याच्या दिवशी आरोग्य विमा संरक्षण पत्र सर्व गाईड लोकांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते दिले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button