शैक्षणिक घडामोडी

Maharashtra SSC Result Date 2023: प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

Maharashtra SSC Result Date 2023: प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

Maharashtra SSC Result Date 2023: प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
——
: बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, हा निकाल उद्या जाहीर होणार आहे. निकाल लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा? याचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.दहावीच्या मार्च – एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.
कुठे पाहाल निकाल?
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल -www.mahresult.nic.inhttp://sscresult.mkcl.orghttps://ssc.mahresults.org.inwww.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
SSC Result 2023 : असा पाहा निकाल
स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.स्टेप ४) तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button