गावगाथाठळक बातम्या

लेख: त्रासदायक प्रवासात सत्कर्माची संधी… मनोगत- रेखा सोनकवडे

HTML img Tag Simply Easy Learning    

काल रात्री पुणे ते अक्कलकोट स्लीपर ट्रव्हल्स गाडीने प्रवास करत असताना ड्राइव्हरने आम्ही बसलेल्या गाडीचा पाटा तुटला असल्याचे सांगून गाडी पुढे जाणार नाही असे सांगितले .मध्यरात्र होती प्रवासी घाबरले नाविलाजास्तव ब्यगा घेऊन खाली उतराव लागले .सगळीकडे अंधार पसरलेला गाडीच्या पायऱ्या उतरत असताना एक आजी पिशवी घेऊन खाली पडली थोडसं लागल रडू लागली सोबत तिच्या कोणी नव्हते.

HTML img Tag Simply Easy Learning    

मी पटकन पुढे गेले अन आजीला बाजूला करून कुठे काय लागल का बघितलं डोळे माझ्या पदराने पुसून शांत व्ह्यायला सांगितल पाणी दिल प्यायला अन धरून दुसऱ्या गाडीत नेलं .ती दुसरी ट्रव्हल्स होती पण एकाच मालकाची .दोन तास ताटकळत बसून गाडीत चढलो तर बसायला पण जागा नाही .कसेबसे आजीचा पिशवी व आजीला घेऊन आत गेले अन जाण्या येण्याच्या वाटेत मिळेल त्या जागेत बसलो .आजीला त्रास होत होता त्यांना मानसिक आधार दिला .माझ्या जवळ घेऊन बसले माझी शॉल अंथरूण दिली मांडीवर डोकं ठेऊन झोपायला सांगितल आजी शांत झोपली पण माझ्या पायाला कळ आली पण वाटलं आजीला झोप लागली उठवायला नको .इथे माझी महिला सुरक्षा संघटना जागृत झाली.

HTML img Tag Simply Easy Learning    

अंधाऱ्या मध्यरात्री एकटी महिला अडचणीत असताना तिला आधार देणं हे माझ नि माझ्या महिला सुरक्षा संघटनेच कर्तव्य आहे आणि ते मनापासून पार पाडले याचा आनंद नि समाधान मिळाले .थोडक्यात आजीची कहाणी ऐकुन समजदारीचे चार शब्द सांगितले ते त्यांना पटले .खुप खुप कौतुक करून आजीला दवाखान्यात जा म्हणून कांही पैसे मी दिले तेव्हा तिच्या डोळ्यातून चमकणारे पाणी कायम माझ्या लक्षात राहिल कारण त्या आसवाने बरंच कांही अनुभव सांगून गेल्याचा भास झाला .ती आजी निघून गेली अन मला खूप मोठे समाधान वाटले की मी माझा कसलाही विचार न करता एका महिलेला आधार दिला .सोलापूर जिल्हा महिला सुरक्षा संघटना जिल्हा अध्यक्ष म्हणून मला फार आभिमान वाटला आणि छान वाटलं की कोणाच्या अश्या प्रसंगी पण मदत करू शकते .आपल्या समोर कसा नि कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही पण आपली भावना मदत करण्याची असावी .प्रसंग समजून सहकार्य करावे कुठंतरी पुण्याचे काम आपल्या हातून घडावे .बाहेरच्या नात्यात पण रक्ताची नाती शोधावी म्हणजे नक्कीच मदत करू शकु.

HTML img Tag Simply Easy Learning    

दुसरा एक प्रसंग कालच्या प्रवासात घडला की एक माणूस वरच्या शीटवर झोपुन मोबाईलवर गाणी लावला आणि आवाज मोठा केला ज्याच्या त्रास सगळ्यांना होत होता पण कोणी त्याला सांगत नव्हते .बराच वेळ होऊनही तो मोबाईल बंद करेना बरीच लोकं झोपी गेली .मला राग आला अन मी त्या व्यक्तीला आवाज दिला अन म्हणाले दादा आवाज कमी करा .गाडीत मुलं महिला म्हातारे बसलेले आहेत सगळ्यांना त्रास होतो पण तो ऐकायला तयार नाही सांगूनही ऐकत नाही म्हणून माझी महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली माझा पवित्रा घेतला अन म्हणाले पुढच्या पाच मिनिटांत मोबाईलचा आवाज कमी नाही केला तर तुझा मोबाईल गाडीच्या खाली फेकून देईन अन तुला ड्राइवरजवळ बसायला लावेल .लोकांना त्रास देण्याची शिक्षा काय असते तुला दाखवुन देऊ का अस आवेशात आणि जोरात बोलल्यावर गाडीतले सगळे लोकं चिडून त्याला ओरडायला लागले आणि त्याने लगेचच मोबाईल बंद केला तो शेवटपर्यंत चालूच केला नाही .गाडीतले प्रवासी माझ्या धाडसाचे कौतुक करू लागले .तेव्हा मी माझ्या महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली धन्यवाद दिला कारण त्यामुळेच तर माझ्यात वीरांगणा संचारते आणि काहीतरी चांगले घडते माझ्या हातून मग मला आनंद होतो . तिसरी घटना अशी घडली की गाडी बंद पडल्यावर एक माणूस ड्राइवरला घाण अगदी आईवर शिवा देत होता .ड्राइवर सांगत होता यात माझी काय चूक आहे .मशीन आहे काहीही होऊ शकत .तुम्हाला गाडी दुरुस्त होईपर्यंत थांबायच असेल तर थांबा नसेल तर मी बसवून देतो त्या गाडीत जावा पण तो ऐकतच नव्हता नको ते शब्द वापरत होता ते ऐकायला नको वाटत होते .बरेचजण सांगत होते गप्प बसायला .मग मला राग आला कारण कोणीही आई बहिनींवर बोललेल मला ऐकवत नाही .मी म्हणाले आईवर बोलू नका नाहीतर आम्ही सगळे मिळुन मारू .पहिली चापट मी मारेन .तो म्हणाला तुम्ही कोण मला बोलणारे तेंव्हा मी मोबाईल मधला माझा महिला सुरक्षा संघटनेचे ओळखपत्र दाखवले तेंव्हा तो दचकला आणि गप्प बसला आणि माफी मागू लागला .मी म्हटलं माझी नको त्या ड्राइवरदादाची माग .त्यानंतर त्याचा आवाजच बंद झाला अन सगळ्यांची माफी मागितली गाडी बंद पडलेल्या तीन तासात या दोन घटना मला माझ्यातले धाडस दाखवुन गेल्या आणि मी इतरासाठी काहीतरी करू शकते याच समाधान आणि आनंद मिळाला .

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रवास तर त्रासदायक झाला पण यावेळेत घडलेल्या घटना खूप कांही सांगून गेल्या .मला माझ्या संघटनेचे काम करण्याची इतरांना मदत करण्याची संधी आणि प्रेरणा मिळाली .मी रेखा लक्ष्मण सोनकवडे महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली .सोलापूर जिल्हा अध्यक्षा .छोट्या छोट्या गोष्टीतून महिलाना आधार न्याय देण्याचे काम नक्की करू शकतो .समाजकंटकांना धडा देऊ शकतो .आपण इतरांसाठी आधार देणं खूप मोठी गोष्ट आहे .त्यातून मला आनंद मिळतो . माझ्या आनंदासाठी समाजउपयोगी कार्य घडत राहो .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button